Agriculture Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

Agriculture Update : कोकण विभागातील कृषी सल्ल्याबाबतची माहिती या लेखातून पाहुयात.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

कडधान्य पिके

फुलोरा अवस्था ते शेंगा भरणे

वाल, चवळी पिकामध्ये फुलोऱ्यात येण्याची व दाणे भरण्याची अवस्था ओलाव्यासाठी अतिसंवेदनशील असते. या कालावधीत पाणी देऊन पाण्याची कमतरता भासणार नाही, याची काळजी घ्यावी.

वेलवर्गीय भाजीपाला पिके

या पिकांमध्ये नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. ही अळी पानाच्या आत शिरून आतील भाग खाते, त्यामुळे पानावर नागमोडी रेषा दिसून येतात.प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी निंबोळी अर्क (४ टक्के) किंवा कडुनिंबयुक्त कीटकनाशक ॲझाडीरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ मि.लि. किंवा डायमेथोएट १.५ मि.लि.

भेंडी

पूर्वमशागत व पेरणी

उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी जमिनीची नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर १५० किलो चांगले कुजलेले शेणखत प्रति गुंठा जमिनीत मिसळावे. लागवड ४५ × १५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणी वेळी ७०० ग्रॅम युरिया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ४०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति गुंठा खतमात्रा द्यावी. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.

Agriculture
Crop Advisory : कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)

मिरची

वाढीची ते फुलोरा अवस्था

मिरची पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिकामध्ये निळ्या रंगाचे चिकट कागदाचे सापळे लावावेत.

प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी हलके पाणी देत असलेल्या मिरची पिकामध्ये व्हर्टिसिलिअम लेकॅनी किंवा बिव्हेरिया बॅसियाना ५ ग्रॅम किंवा ५ मि.लि. अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये फिप्रोनील (५ टक्के प्रवाही) १.६ मि.लि. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी पानांच्या दोन्ही बाजूंस बसेल अशी करावी.

भुरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पांढऱ्या भुकटीच्या स्वरूपातील बुरशीची वाढ दिसून येते. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

Agriculture
Crop Advisory : कृषी सल्ला

कलिंगड

लागवड ते फळधारणा अवस्था

तापमानात वाढ संभवत असल्याने कलिंगड फळांचा सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी फळे भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत.

कलिंगड पिकामध्ये पांढरी माशी, मावा, फुलकिडे इ. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. या रसशोषक किडी पानाच्या खाली राहून पानांतील अन्नरस शोषतात. परिणामी, पाने पिवळी होतात. किडींच्या व्यवस्थापनासाठी पिकामध्ये पिवळे चिकट सापळे प्रति गुंठा एक या प्रमाणात लावावेत.

किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि.

कलिंगड पिकामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे प्रादुर्भावग्रस्त फळे पूर्ण वाढ न होता गळून पडतात, काही फळे वेडीवाकडी वाढून गळून पडतात. फळमाशीच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये फुले येण्यास सुरुवात झाल्यापासून एकरी दोन ‘क्यु ल्युअर’ रक्षक सापळे लावावेत. तसेच वेळोवेळी शेतातील कीडग्रस्त फळे गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.

फळधारणा अवस्थेत असलेल्या कलिंगड पिकाला ३ ते ४ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. पाण्याचा ताण देऊ नये. पाण्याच्या अनियमित पाळ्या दिल्यावर फळे तडकण्याची शक्यता असते.

काळी मिरी

पक्वता

काळी मिरीच्या घोसातील १ ते २ दाणे पिवळे किंवा तांबडे लाल झाल्यावर मिरीची काढणी करावी.

दुसऱ्या दिवशी मिरीचे दाणे घोसापासून वेगळे करून बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कापडात भरून उकळत्या पाण्यात एक मिनिटे बुडवावेत. त्यानंतर उन्हामध्ये ३ ते ४ दिवस चांगले वाळवावेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com