
हरभरा
फुलधारणा ते घाटे धरणे.
हरभरा पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. मागील दोन दिवसांतील ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी ‘T’ आकाराचे एकरी २० पक्षिथांबे लावावेत. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
ॲझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) २ ते ३ मिलि किंवा
क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी) २ मिलि किंवा
इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ०.४५ ग्रॅम.
करडई
शाखीय वाढीची ते कळी धरणे
करडई पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
सध्याचे कमाल व किमान तापमान हे मावा प्रादुर्भावास अनुकूल आहे. करडई पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी
डायमिथोएट (३० टक्के) १.३ मिलि
ऊस
लागवड
हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड करावी. हंगामी उसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत करता येते.
हळद
काढणीपूर्व
हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होते. मात्र काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे.
उन्हाळी तीळ
पूर्वमशागत
उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत.
संत्रा/मोसंबी
फळ वाढीची
मृग बहर धरलेल्या संत्रा/मोसंबी फळबागेत फळाचा आकार वाढण्यासाठी पोटॅशिअम सल्फेट (००:००:५०) १ किलो अधिक जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
बागेत खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.
बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
फुलशेती
वाढीची/ काढणी
फुलपिकात अंतरमशागतीची कामे करावीत. तण नियंत्रणावर भर द्यावा.
आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.
तुती रेशीम उद्योग
रेशीम कीटकांचे थंडी पासून संरक्षण करण्यासाठी संगोपनगृहात कोळशाची शेगडी किंवा इलेक्ट्रानिक शेगडीचा वापर करावा. संगोपनगृहात कोळश्याचा धूर होणार नाही व तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअस व सापेक्ष आर्द्रता ८० ते ८५ टक्के राहील याची काळजी घ्यावी.
फांदी पद्धतीमध्ये मजुरीत २० टक्के बचत होते. कच्च्या संगोपनगृहात थंडी किंवा उष्णता मर्यादित ठेवणे कठीण होते. म्हणून हळूहळू पक्के सिमेंट काँक्रेटचे संगोपनगृह बांधकाम करून घ्यावे. त्यामुळे रेशीम कीटक रोगास बळी पडत नाहीत. धुळीचा त्रास कमी होतो आणि कोषाच्या उत्पादनात वाढ होते.
सीएसआर ॲण्ड टीआय म्हैसूर यांच्या शिफारसीनुसार संगोपनगृहाचा आकार असावा. खालच्या व वरील बाजूस झरोके व मधील बाजूस खिडक्या असाव्यात. म्हणजे हवा खेळती राहण्यास मदत होते.
पशुधन व्यवस्थापन
थंडीच्या दिवसांत बोचरे थंड वारे वाहू लागतात. त्या वेळी आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरिता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी. माफक प्रमाणात हवा खेळती असावी.
नाकातून पाणी येणे, भूक मंदावणे, चालण्याकरिता कष्ट होणे इ. लक्षणे दिसू लागताच पशुवैद्यकाशी त्वरित संपर्क साधावा.
सर्वसाधारणपणे बकरीच्या पिलांना थंडीची बाधा लवकर होते. थंडीच्या दिवसांत करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिलांना ठेवता येऊ शकते. त्यामुळे थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी.
शेळीचे दूध भरपूर प्रमाणात द्यावे, त्यामुळे पिलांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होते.
भाजीपाला
वाढीची/ काढणी
भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मागील दोन दिवसातील ढगाळ वातावरणामुळे, वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत. या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावेत.
फवारणी प्रति लिटर पाणी
क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) ०.४ मिलि किंवा क्लोरपायरिफॉस (२० टक्के एससी) २ मिलि किंवा सायपरमेथ्रीन (१० टक्के ईसी) १.१ मिलि.
मागील दोन दिवसांतील ढगाळ वातावरणामुळे, काकडीवर्गीय भाजीपाला पिकात बऱ्याच ठिकाणी डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव दिसून आहे. प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर लिटर पाणी
ॲझोक्सिस्ट्रोबिन (२३ टक्के एससी) ०.२५ ग्रॅम.
भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
- डॉ. के. के. डाखोरे, ९४०९५४८२०२
(मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.