Weather Impact : प्रतिकूल हवामानामुळे द्राक्ष बागांवर कुऱ्हाड

Grape Orchards Issue : प्रतिकूल हवामानाचा परिणाम यावर्षी जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे वीस टक्के द्राक्ष बागेत घडनिर्मितीच झाली नाही.
Grape Orchards
Grape OrchardsAgrowon
Published on
Updated on

Pune News : प्रतिकूल हवामानाचा परिणाम यावर्षी जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे वीस टक्के द्राक्ष बागेत घडनिर्मितीच झाली नाही. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तीस टक्के बागेतील घड जिरल्यामुळे अल्प घडनिर्मिती झाली असून घडाचा आकार लहान आहे.

या वर्षी द्राक्ष उत्पादनात सुमारे ५० टक्के घट होणार आहे. याचा फटका सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रातील प्रामुख्याने काळ्या जम्बो जातीच्या द्राक्ष बागांना बसला आहे. त्यामुळे सुमारे दीडशे एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली आहे. जुन्या द्राक्ष बागा काढून पावसाळी वातावरणात तग धरणाऱ्या नवीन परदेशी पेटंट व्हरायटीच्या द्राक्ष बागा लावण्याच्या तयारीत तालुक्यातील द्राक्ष उत्पादक आहेत.

Grape Orchards
Grape Farming : हवामान बदलानुसार द्राक्षाचे संरक्षण गरजेच

जुन्नर तालुका प्रामुख्याने काळ्या जातीच्या(ब्लॅक) निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहे. तालुक्यातील जम्बो द्राक्षाने प्रामुख्याने चीन, बांगलादेश, दुबई, श्रीलंका आदी देशातील बाजारपेठ काबीज केली आहे. तालुक्यात सुमारे चार हजार एकर क्षेत्रात जम्बो, रेडग्लोब, शरद सीडलेस, तास ए गणेश, थॉमसन सीडलेस, सोनाका, किंगबेरी, क्रिमसन आदी जातीच्या द्राक्ष बागा आहेत. दरवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात द्राक्ष बागांची माल छाटणी केली जाते.

यावर्षी एप्रिल, मे महिन्यांच्या खरड छाटणीनंतर तापमान ४० अंशापेक्षा जास्त राहिले. तसेच सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातील माल छाटणीच्या काळात मुसळधार पाऊस झाल्याने द्राक्ष घड निर्मितीवर मोठा परिणाम झाला आहे. बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका निर्यातक्षम जम्बो, रेडग्लोब, किंगबेरी या जातीच्या द्राक्ष बागांना बसला आहे.

Grape Orchards
Grapevine Crop Impact : पाऊस, ढगाळ वातावरणाचे द्राक्षवेलीवर परिणाम

सुमारे वीस टक्के द्राक्ष बागेत घडनिर्मितीच झाली नाही. पावसामुळे तीस टक्के बागेतील घड जिरल्यामुळे बागेत अल्प घडनिर्मिती झाली असून घडाचा आकार लहान आहे. संप्रेरकांचा वापर करून द्राक्ष मण्यांचा आणि घडांचा आकार मोठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या बहुतेक द्राक्ष बागेत थीनिंगची (घड विरळणी) कामे सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्यात द्राक्ष तोडणीचा हंगाम सुरू होणार आहे.

तालुक्यातून जानेवारी ते एप्रिल दरम्यान सुमारे दोन हजार टन द्राक्षाची निर्यात केली जाते. तर देशांतर्गत बाजारपेठेत सुमारे एक ते दीड हजार टन द्राक्षाची विक्री केली जाते. या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांची उलाढाल होते. यावर्षी द्राक्ष उत्पादनात ५० ते ६० टक्के घट होणार आहे. जुन्या बागा तोडून पावसाळी वातावरणात तग धरणाऱ्या परदेशी जातीच्या द्राक्षाची लागवड या वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. जुन्या बागा तोडाव्या लागत असल्याने शेतकऱ्यांना एकरी चार ते पाच लाख रुपयांचा फटका बसला आहे.
अवधूत बारवे, द्राक्ष उत्पादक शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com