Grape Farming : हवामान बदलानुसार द्राक्षाचे संरक्षण गरजेच

Crop Protection : द्राक्ष उत्पादनाच्या अनुषंगाने हंगामात कीड व रोगांच्या उपाययोजनांसाठी अचूक नियंत्रण करण्यासाठी प्रादुर्भावाची कारणे शोधून उपाययोजना करणे फायद्याचे आहे.
Grape Farming
Grape Farming Agrowon
Published on
Updated on

Nashik News : द्राक्ष उत्पादनाच्या अनुषंगाने हंगामात कीड व रोगांच्या उपाययोजनांसाठी अचूक नियंत्रण करण्यासाठी प्रादुर्भावाची कारणे शोधून उपाययोजना करणे फायद्याचे आहे. खर्च कमी करून द्राक्ष उत्पादनात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे महत्त्वाचे आहे. हवामानातील बदल नुसार पीक संरक्षण वर लक्ष देऊन कामकाजात बदल करावा, असा सल्ला के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे प्रा. तुषार उगले यांनी दिला.

‘सकाळ अॅग्रोवन’ आणि ‘पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि.’ यांच्यातर्फे गुरुवारी (ता. २८) सकाळी खेडगाव (ता. दिंडोरी) येथील श्री राम मंदिर सभागृहामध्ये दर्जेदार द्राक्ष पीक आणि कीड-रोग व्यवस्थापन या विषयावर ‘अॅग्रोवन संवाद’ चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

या वेळी पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि.चे कृषी विभाग मुख्य विक्री व्यवस्थापक अरविंद सुळे, ॲग्रोवन वितरण विभागाचे सहायक व्यवस्थापक महेश बेले,  प्रसाद गोसावी, रोहित शिंदे, मंगेश पगार आदींसह द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते. वसंत पगार, रोशन नाठे यांचा सन्मान करण्यात आला.

पुढे बोलताना उगले म्हणाले, की द्राक्ष हंगामामध्ये बागेतील झाडे सक्षम व सशक्त असणे गरजेचे ठरते. झाडे प्रतिकारक असतील, तर रोग नियंत्रणातील आव्हाने कमी होतात. रासायनिक कीटकनाशकांमध्ये काही ठरावीक कृषी रसायने आहेत की ज्यांचा काळजीपूर्वक वापर करावा लागणार आहे. त्याची पातळी राखून योग्य ती खबरदारी घ्यावी लागते. जैव आधारित फवारण्यांवर जास्तीत जास्त भर देणे महत्त्वाचे आहे.

Grape Farming
Grape Farming : द्राक्षशेतीतील संशोधक, तंत्रज्ञ, प्रगतिशील नाव- सुभाष आर्वे

सुळे म्हणाले, की जमिनीची सुपीकता जर टिकवून ठेवायची असेल तर सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्त्वाचा आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. सेंद्रिय खतामध्ये जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला जातो. मात्र शेणखत उकिरड्यातून उपसून थेट शेतात पसरतात.

Grape Farming
Grape Farming : द्राक्षशेतीला ठरला पोल्ट्री व्यवसाय आधार

पण हे शेणखत व्यवस्थित कुजलेले नसेल. तर शेणखताचा पिकाला फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होते. शेणखत चांगले कुजविण्यासाठी कंपोस्ट कल्चरचा वापर करावा. कंपोस्ट कल्चर शेणखतावर टाकून शेणखत चांगले खाली-वर करावे.

बंदी असलेल्या कीटकनाशकांचा वापर टाळावा

द्राक्षामध्ये मिलीबग नियंत्रणासाठी जैविक घटकांची आवश्यकता आहे. व्हर्टिसिलियम लेकेनी बिव्हेरिया बेसियाना मेटारायझियमचा वापर ५० दिवसांच्या पुढे करावा. अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी जैविक खते स्लरीच्या माध्यमातून द्यावे.

भुरी डाऊनी नियंत्रणासाठी सुडोमोनस, बेसिलस, एम्पलोमायसिस यांसारख्या जैविक घटकांचा वापर करावा रेसिड्यू नियंत्रित करण्यासाठी बंदी असलेल्या कीटकनाशकांचा वापर टाळावा, असे प्रा. उगले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com