Water Crisis : टंचाईत जलसाठ्यावर प्रशासनाची नजर

Administration Works Update : लातुर जिल्ह्यातील लहान व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. भविष्यात मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी विविध पथके नियुक्त केली आहेत.
Water Issue
Water IssueAgrowon

Latur News : लातुर जिल्ह्यातील लहान व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. भविष्यात मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी विविध पथके नियुक्त केली आहेत. आता या पथकाच्या माध्यमातून कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. यात गेल्या काही दिवसात जिल्ह्यात ८६ वीजपंप, १२८ स्टार्टर, १०९ वायर बंडल जप्त करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील जलाशयातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यात कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनही होत आहे. ग्रामीण भागात टंचाई सदृश स्थिती आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जलाशयातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित केला आहे.

Water Issue
Water Scarcity : उरणमध्ये आठ गावांत पाणीप्रश्‍न ऐरणीवर

असे असताना देखील बहुतांश जलाशयातून पाण्याचा अवैध उपसा सुरू आहे. वीजपंप लावून पाइपलाइन करीत हा पाणी उपसा केला जात आहे. जिल्ह्यात पाण्याचा अवैध उपसा जोरात सुरू आहे.

Water Issue
Water Crisis : ‘दिघंची’ कोरडाच, ‘टेंभू’चे पाणी असूनही टंचाई

हा अवैध उपसा रोखण्यासाठी प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा अथवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता, महावितरणचे शाखा अभियंता, संबंधित महसूल मंडळ अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक यांची पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली जात आहे.

आतापर्यंत ८७५ वीज जोडणी तोडल्या

जिल्ह्यातील जलाशयातील मोठ्या प्रमाणात अवैध उपसा सुरु आहे. त्यामुळे विविध पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात अशा जलाशयातील अवैध उपसा करण्याच्या ठिकाणचे ८७५ वीज जोडण्या तोडण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com