Crop Damage : नागपूर कृषी विभागाच्या लेखी केवळ ८० हेक्‍टर नुकसान

Agriculture Department : अमरावती जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या पावसामुळे १५५ कोटी रुपयांचे नुकसान नोंदविण्यात आले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Nagpur News : अमरावती जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या पावसामुळे १५५ कोटी रुपयांचे नुकसान नोंदविण्यात आले. त्याच वेळी नागपूर जिल्ह्यात मात्र याच महिन्यात केवळ ८० हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान दर्शविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्‍त होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यात सातत्याने वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट होत आहे. त्याचा फटका उशिरा कापणीला आलेला गहू, हरभऱ्यासह भाजीपाला व फळपिकांना बसला. संत्रा-मोसंबीचे देखील यामुळे नुकसान झाले. एप्रिल महिन्यात हे नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage : पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मात्र याच काळात प्रशासकीय यंत्रणा लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने नुकसान सर्व्हेक्षण व पंचनाम्याचे काम अपेक्षित झाले नाही. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाच त्याची नोंद अवघी ८० हेक्‍टर इतकीच घेण्यात आली, असा आरोप केला जात आहे. काही शेतकऱ्यांनी तर निवडणूक कामात व्यस्त असल्याचे सांगत काही अधिकाऱ्यांकडून कार्यालयात टेबलवर बसूनच हे सर्व्हेक्षण करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Crop Damage
Crop Damage : श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा

यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचेही काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काटोल, नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी हा गंभीर प्रकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे या भागात दौऱ्यावर असताना त्यांच्या निदर्शनास आणून दिला. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी टी. के. चौधरी, डॉ. प्रवीण दवणे, विक्रम भवारी, कुणाल ठाकूर, राकेश वसु, महाऑरेंजचे संचालक मनोज जवंजाळ देखील उपस्थित होते.

अमरावतीला भरपाई, नागपूर वगळला

गारपीट, पाऊस कोसळून गेल्यावर झाडावर बुरशीचा प्रादुर्भाव वाढत नंतर चार ते पाच दिवसांनी फळगळती होते. त्यामुळे सर्व्हेक्षण व पंचनाम्यात याची नोंद तत्काळ घेणे शक्‍य होत नाही. अमरावतीत यापूर्वी नैसर्गिक आपत्तीत नोंद घेत सर्व्हेक्षण करून मदत देण्यात आली होती. या वेळी देखील अमरावतीमध्ये १३७ कोटी रुपयांच्या संत्रा पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. त्याच वेळी नागपूर जिल्ह्यात मात्र हे नुकसान अवघे ८० हेक्‍टर दाखविण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com