Crop Damage : श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा

Rain Update : नगर जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूर, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यांत गुरुवारी (ता.१६) वादळी वाऱ्यासह अनेक भागांत जोरदार पाऊस झाला.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Nagar News : नगर जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूर, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यांत गुरुवारी (ता.१६) वादळी वाऱ्यासह अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले, विजेचे खांब कोसळले, पोल्ट्रीवरील पत्रे उडाल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस सुरू असल्याने उन्हाळी पिकांसह फळपिके, भाजीपाल्याला फटका बसत आहे.

श्रीरामपूर तालुक्यात काल जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. शहरासह, बेलापूर व प्रवरा पट्ट्यात दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने अवघ्या दहा ते बारा मिनिटांत दाणादाण उडवली. मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली. ऐनतपूर परिसरात घराचे छत उडून सर्व संसार उघड्यावर आला. एकरेलहरे परिसरात किरकोळ नुकसान झाले.

बेलापूर खुर्द येथील हरिश्‍चंद्र दगडू पुजारी या शेतकऱ्याची दीड एकर केळीची बाग उद्ध्वस्त झाली. बेलापूर रस्त्यावरील रसवंतीसमोरील अनेक झाडांच्या फांद्या तुटून श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावर पडल्या. आझादवाडी येथे संजय खंडागळे यांच्या घरावरील पत्रे उडले. घराचे सीलिंग व वरवंडी घरातच कोसळल्याने संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले. श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यात झाडे पडली. काही ठिकाणी विजेचे पोलही पडले.

Crop Damage
Crop Damage : मराठवाड्यात नऊ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

बेलापूर खुर्द येथील हरिश्‍चंद्र पुजारी यांची दीड एकर केळीची बागच उन्मळून पडली. एकलहरे शिवारात आदिवासी कुटुंबाच्या घरावरील छत उडाले, तर काही दुकानांवरील पत्रे उडून गेले. प्रवरा पट्ट्यात थोडा वेळ पाऊस झाला. महांकाळवाडगाव, मुठेवाडगाव, उंदीरगाव, माळेवाडी आदी भागांत पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्याने महावितरणचे मोठे नुकसान केले आहे. श्रीरामपूर शहर, बेलापूर, एमआयडीसी, ममदापूर, टाकळीमियाँ परिसरातील १०० ते १२५ विजेचे पोल वाकले, तसेच काही ठिकाणी तुटून पडले आहेत.

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील करंजी व पढेगाव परिसराला गुरुवारी दुपारी गारपिटीसह वादळी पावसाने झोडपून काढले. कांदाचाळ, घरांवरील छपरे उडून गेली. रस्त्यांवर तसेच ट्रॅक्टरवर, कांदा चाळीवर झाडे पडली. विजेचे खांब कोसळल्याने बीजपुरवठा खंडित झाला. सुमारे तासभर झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी ओडेनाले वाहिले.

Crop Damage
Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

गुरुवारी (ता. १६) पूर्व भागातील करंजी बुद्रुक, पढेगाव परिसरात अचानक दुपारी अडीच वाजेनंतर टपोऱ्या गारपिटीसह वादळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. वादळात मौजे पढेगाव येथील परमेश्‍वर दगू मापारी यांच्या घराचे संपूर्ण पत्रे उडाले. काही पत्रे दूरवर उडून झाडावर अडकले होते. त्यात आशा परमेश्‍वर मापारी (वय ३०), उषा गोपीनाथ ढोले (वय ३२) जखमी झाल्या.

काही ठिकाणी झाडे गोठ्यावर, ट्रॅक्टर, कांदा चाळीवर पडल्याने नुकसान झाले आहे प्राथमिक माहिती नुसार कोणतीही जीवितहानी झाली नाही. वादळी पावसात विजेचे खांब मोडून वाहिन्या तुटल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळाने आंब्याचे नुकसान झाले आहे. पाथर्डी श्रीगोंदा पारनेर भागातील ही काही गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com