SAATHI Portal: शेतकऱ्यांचा खरा ‘साथी’

Farmer Rights: बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची कोणत्याही पातळीवर फसवणूक होऊच नये, यासाठी चांगली व्यवस्था उभी करण्यावर प्रयत्न झालेत. यातूनच भारत सरकारने शेतकऱ्यांना त्यांचा खरा ‘साथी’दार मिळवून दिला.
SAATHI Portal
SAATHI PortalAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रीती सवाईराम

Agriculture Policy in india: बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची कोणत्याही पातळीवर फसवणूक होऊच नये, यासाठी चांगली व्यवस्था उभी करण्यावर प्रयत्न झालेत. यातूनच भारत सरकारने शेतकऱ्यांना त्यांचा खरा ‘साथी’दार मिळवून दिला. आता ‘साथी’ पोर्टलचं नाव शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे.

जून महिन्याचे कॅलेडर समोर येण्यापूर्वी बळीराजा आभाळाकडे टक लावून बघतो. नभात काळ्या ढगांची गर्दी त्याला सुखावणारी असते. त्याची खरीप हंगामाची तयारी जवळपास पूर्ण होताच काळ्या मातीचा मालक उद्याच्या हिरव्यागार स्वप्नांची पेरणी करायला तो बियाणं विकत घेतो. त्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून बियाण्यांच्या बातम्या प्रसिद्ध होताना दिसतात. कुठे जास्त भावाने बियाण्याची विक्री तर कुठे निकृष्ट दर्जाचे बियाणे, तर कुठे बियाण्याचा कृत्रिम तुटवडा!

अशा घटनांतून शेतकऱ्यांची फसवणूक, लूट आणि शोषण होतं हे उघड आहे. या सर्व बाबींवर शासनाचा कृषी विभाग सातत्याने विचार करीत असतो. बियाणे व गुणवत्ता नियंत्रण अधिकारी चुकीच्या प्रकारांवर कठोर कारवाई करतात. काही दिवसांपूर्वी नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या व्यक्तीविरोधात कृषी विभागाने कठोर कारवाई केली आहे. बनावट बियाण्याची विक्री, मुदतबाह्य बियाणे, चढ्या भावात बियाण्यांची विक्री अशा सगळ्या चक्रात बळीराजा पिसला जातो, या वास्तवाला कोणतीही व्यवस्था नाकारू शकत नाही.

SAATHI Portal
Indian Agriculture: जनुकीय संपादन : शाश्वत अन् सुरक्षितही

शासनाचा कृषी विभाग कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी झटत आला आहे. आजार माहीत झाल्यावर इलाज होतो हे ठीक, मात्र आजारच होऊ नये, यासाठी कोणती व्यवस्था उभी करता येईल, या विचाराने शासन, प्रशासन, कृषितज्ज्ञ, शेतकरी यांच्यात विचारविनिमय होत गेला. राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी या सर्व अडचणीतून बाहेर पडण्याचा विचार सातत्याने मांडला व कार्यान्वितही केला आहे.

साथी पोर्टल

बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक केवळ एका शेतकऱ्यापुरती मर्यादित राहत नाही. सामाजिक न्याय व समाजाच्या उत्थानाच्या विचारालाही अशा घटना नख लावतात, ही बाब खूप संवेदनशीलतेने सर्वांनी प्राधान्याने विविध व्यासपीठांवरून मांडली. बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची कोणत्याही स्तरावर व पातळीवर फसवणूक होऊच नये, यासाठी चांगली व्यवस्था उभी करण्यावर प्रयत्न झालेत. भारत सरकारने शेतकऱ्यांना त्यांचा खरा ‘साथी’दार मिळवून दिला.

शासनाच्या कृषी खात्याच्या ‘बियाणे’विभागाकडून ‘साथी पोर्टल’चा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. साथी पोर्टल कसं काम करते किंवा शेतकऱ्यांना या पोर्टलचा नेमका फायदा काय होईल, याबाबत माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्म वरून सतत जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र शासनाने बियाण्याच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत संनियंत्रणासाठी साथी पोर्टल विकसित केले आहे. साथी पोर्टलचा वापर अत्यंत सोप्या पद्धतीने करता येतो.

SAATHI Portal
Indian Agriculture: आत्मनिर्भर की आयात निर्भर

पोर्टलवर काय आहे?

साथी पोर्टलवर ९९६ प्रमाणित व १६१४ सत्यप्रत बियाणे उत्पादक कंपन्या, २०९ बीज प्रक्रिया केंद्रे आणि ७४ हजार ३६६ बियाणे विक्रेत्यांची नोंदणी झालेली आहे. साथी पोर्टलची अंमलबजावणी फेज 1 आणि फेज 2 अशा दोन टप्प्यांत होत असून साथी प्रकल्पाच्या एकूणच अंमलबजावणीमध्ये देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. त्यामध्ये फेज 1 - पैदासकार, पायाभूत व प्रमाणित बीजोत्पादन तर फेज 2 - उत्पादित बियाण्याचे वितरण व विक्री यांस प्राधान्य देण्यात आले आहे.

साथी पोर्टल शेतकऱ्यांचा खरा साथीदार कसा, असा प्रश्‍न सहज विचारला जाऊ शकतो. साथी पोर्टलवर बियाणे कंपन्या, बीज प्रक्रिया केंद्रे आणि विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे. कृषी विभागाकडून विक्रेत्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्यात तसेच त्यांचे नोंदणीकरण करून घेतले आहे. या सर्व नोंदणीकृत बियाणे उत्पादक कंपन्या, बीज प्रक्रिया केंद्रे साथी पोर्टलवर आल्यामुळे एकाअर्थी शासनाच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवर नोंदणीकृत विक्रेत्याकडूनच बियाण्यांची खरेदी करणे अपेक्षित आहे.

नोंदणीकृत बियाणे विक्रेत्यांनी कोणत्या भागात बियाण्यांची विक्री करावी यावर आता शासनाचे नियंत्रण असणार आहे. बियाणे बॅगवर QRकोड लावलेला असेल. कोणीही शेतकरी ग्राहक बियाणे विकत घेण्यापूर्वी अँड्रॉइड मोबाईलमधून QRकोड स्कॅन करून बियाण्याची सत्यता तपासून घेऊ शकतो. साथी पोर्टलवर नोंदणी न केलेल्या कोणत्याही विक्रेत्याला बियाणे विकण्याची परवानगी नसणार आहे, ही बाब खूप स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. अवैध पद्धतीने कोणी बियाणे विक्री करताना आढळल्यास प्रचलित कायद्यानुसार थेट फौजदारी कारवाई प्रस्तावित होऊ शकते.

SAATHI Portal
Indian Agriculture : अशांत शेतकरी, निवांत सरकार

शेतकऱ्यांची बियाणे खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. शेतकऱ्यांनी नोंदणीकृत बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करणे ही एकमेव बाब पार पाडली की पुढील सर्व बाबी सहज होत जातील. साथी पोर्टलवर शासनाचे नियंत्रण आहे. प्रमाणित बियाणे ‘साथी पोर्टल’वरूनच विक्री करण्याचे बंधन कृषी विभागाने सर्व कंपन्यांना घातले आहे. त्यामुळे जे बियाणे गुणवत्तापूर्वक असेल, तेच विक्री करता येणार आहे. तसेच सत्यप्रत बियाण्यांची विक्री पूर्णपणे साथी पोर्टलद्वारे होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

त्यामुळे बनावट आणि मुदत संपलेल्या बियाण्यांची विक्री करणे शक्य होणार नाही. त्यातून शेतकऱ्यांना खात्रीशीर बियाणे मिळण्यास मदत होणार आहे. शासन, प्रशासन, बियाणे कंपनी, बियाणे विक्रेता व ग्राहक शेतकरी यांच्यात एक उत्तम समन्वय साथी पोर्टलच्या रचनेत अंतर्भूत आहे. बियाणे उत्पादन कंपनी ते थेट शेतकरी, असा प्रवास कृषी विभागाच्या नजरेसमोरून होत जाणार आहे. बियाण्यांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. यामध्ये कृषी विभाग समन्वय तसेच संनियंत्रणाची भूमिका बजावणार आहे.

राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. चालू खरीप हंगामात शासनाने विक्रमी उत्पादनाचे लक्ष ठेवले आहे. राज्यात बियाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. मागणी वाढली की बियाणे कंपन्यांकडून कृत्रिमपणे बियाण्यांची टंचाई निर्माण केली जाते. ही बाब साथी पोर्टलमुळे आता शक्य होणार नाही. कृत्रिम टंचाई व त्यामाध्यमातून चढ्या भावात विक्री या दोन्हीही प्रकाराला आता स्थान नसेल.

बियाण्यांच्या संपूर्ण प्रवासावर (उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर) शासनाचे नियंत्रण आल्याने पारदर्शकता वाढून शेतकऱ्यांस उच्चतम प्रतीचे बियाणे उपलब्ध होण्यात मदत होणार आहे. शेतकरी आपल्या काळ्या मातीत उद्याची स्वप्नं पेरत जातो. आपल्या देशाच्या उभारणीत, जनतेच्या उदरभरणात बळीराजाचा लाखमोलाचा वाटा आहे. अशावेळी साथी पोर्टल शेतकऱ्यांचा खरा साथीदार ठरणार आहे.

९८८१३७२५८५

(लेखिका महाराष्ट्र राज्य कृषी विभागात उपसंचालक (बियाणे) आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com