Majhi Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ वचनपूर्ती सोहळा पूर्वतयारीचा आढावा

Ladki Bahin Scheme : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम माहे सप्टेंबर २०२४ मध्ये नियोजित आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Majhi Ladki Bahin YojanaAgrowon
Published on
Updated on

Solapur News : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम माहे सप्टेंबर २०२४ मध्ये नियोजित आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी प्रत्येक शासकीय यंत्रणेने हा सोहळा यशस्वी होण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. नियोजन भवन येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार बोलत होत्या.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojna : ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’चे त्रुटी असलेले अर्ज फेरसादर करा’

उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा‍ पुरवठा अधिकारी संतोष सरडे, विशेष व गुन्हे पोलिस उपआयुक्त श्रीमती दीपाली काळे, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. आर. ठाकरे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य सर्व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार यांनी बैठकीत बांधकाम विभागाकडून कार्यक्रम स्थळावर करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती जाणून घेतली. तसेच पार्किंग, वीज पाणी, साफसफाई याबाबतची महापालिकेकडून माहिती घेतली व आवश्यक सूचना दिल्या. सर्व विभागांनी सोपविलेली कामे वेळेत पूर्ण करावीत.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लवकरच वचनपूर्ती सोहळा

कार्यक्रम स्थळी शासकीय विभागांनी समन्वय ठेवून नियोजनबद्ध काम करावे, असे सांगितले. पोलिस विभागाने कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन काटेकोरपणे करावे. वाहतुकीस कोठेही अडथळा निर्माण होणार नाही या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था ठेवावी.

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महिला लाभार्थी घेऊन येणे व मेळावा झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सोडणे यासाठी आवश्यक असलेल्या बसेसची पूर्तता करावी. पुरवठा विभागाने लाभार्थ्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्याबरोबरच त्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची ही दक्षता घ्यावी, असे त्यांनी सूचित केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com