Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लवकरच वचनपूर्ती सोहळा

Ladki Bahin Scheme : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर येथे होत आहे.
CM Majhi Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin YojanaAgrowon
Published on
Updated on

Solapur News : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर येथे होत आहे. या मेळाव्यासाठी ३० ते ४० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेने त्यांच्या वर सोपवलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत उपजिल्हाधिकारी श्रीमती कुंभार बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, पोलिस उपअधीक्षक गृह विजया कुर्री, पोलिस उपायुक्त वाहतूक सुरेश खिरडकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

CM Majhi Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin : बँका ‘हाउस फुल्ल’, शिवारात शुकशुकाट

निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती कुंभार म्हणाल्या, की माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागांना जबाबदारीचे वाटप करण्यात आलेले आहे. दिलेल्या जबाबदारी प्रमाणे सर्व संबंधित विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांच्याकडून चोखपणे काम करून घ्यावे.

CM Majhi Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojna : ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’चे त्रुटी असलेले अर्ज फेरसादर करा’

कोणत्याही विभागाला आपल्या कामाविषयी शंका असेल तर त्याचे निरसन तत्काळ करून घ्यावे, असेही त्यांनी सूचित केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तीस ते चाळीस हजार लाभार्थी बसण्याची व्यवस्था अत्यंत चांगली करावी. पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन ही काटेकोरपणे करावे.

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महिला लाभार्थी घेऊन येणे व मेळावा झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सोडणे यासाठी आवश्यक असलेल्या बसेसची पूर्तता करावी. पुरवठा विभागाने लाभार्थ्यांसाठी जेवण व पाण्याची व्यवस्था करावी. तसेच सर्व संबंधित विभागाने परस्परात योग्य समन्वय ठेवून मेळावा व्यवस्थितपणे पार पडेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे त्या म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com