Dryland Farming: कोरडवाहू शेतीसाठी समग्र विचार हवा

Rise of Renfed Programme: कोरडवाहू शेतीतील समस्यांचे समाधान फक्त पाण्यावर आधारित न राहता, त्यात पशुधन, चारा, मासेमारी, जंगल व्यवस्थापन आणि स्थानिक शेतीप्रणाली या घटकांचा समावेश आवश्यक आहे, असा ठाम सूर ‘राइज ऑफ रेनफेड’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात व्यक्त झाला.
Rise of Renfed
Rise of Renfed Agrowon
Published on
Updated on

Mumbai News: ‘कोरडवाहू शेतीतील समस्यांवर उपाय शोधताना केवळ पाणी नव्हे, तर पशुधन, चारा, मासेमारी, जंगल व्यवस्थापन, स्थानिक शेतीप्रणाली आदी सर्व पैलूंवर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या प्रयोगांना यश मिळाले आहे.

त्यातून बोध घेऊन पुढील धोरणांची दिशा ठरवावी लागेल,’ असा सूर राइज ऑफ रेनफेड या राज्यस्तरीय संवाद कार्यक्रमात उमटला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि रिवायटलायझिंग रेनफेड अ‍ॅग्रिकल्चर नेटवर्क (आरआरए नेटवर्क) यांनी संयुक्तपणे मुंबईत २३ व २४ जून रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Rise of Renfed
Dryland Farming: तोट्याच्या कोरडवाहू शेतीचेही अफाट फायदे

राज्यातील कोरडवाहू शेती प्रणाली अधिक सक्षम व अनुकूल बनवणे हे या चर्चासत्राचे उद्दिष्ट होते. या कार्यक्रमात कोरडवाहू क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासनाचे अधिकारी आणि शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाड कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा प्रमुख पाहुणे होते.

ठाण्याचे विभागीय कृषी सहसंचालक बाळाजी ताटे, `पोकरा`चे कार्यक्रम विश्‍लेषक विजय कोळेकर, शबरी आदिवासी विकास महामंडळाचे वरिष्ठ सल्लागार प्रशांत ब्राह्मणकर तसेच आरआरए नेटवर्कचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. सब्यासाची दास, राज्य समन्वयक सजल कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

Rise of Renfed
Dryland Farming : कोरडवाहू शेती विकासाचे मूलमंत्र

डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी कोरडवाहू क्षेत्राच्या गरजा ओळखून कृषी विद्यापीठ व शेतकऱ्यांमध्ये नियमित संवाद घडवून आणला जाईल, अशी ग्वाही दिली. श्री. कोळेकर यांनी पोकरा योजनेतील महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली.

श्री. ब्राह्मणकर यांनी आदिवासी विकास विभागाद्वारे कोरडवाहू भागात आदिवासी समुदायासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. अश्‍विनी कुलकर्णी, मनीष राजनकर, शिरीष जोशी, अविल बोरकर, सजल कुलकर्णी, प्राची पाटील यांनी राज्यातील कोरडवाहू क्षेत्रात सामुदायिक सहभागातून घडून आलेल्या सकारात्मक बदलांची उदाहरणे मांडली. आरआरए नेटवर्कचे प्रफुल्ल कालोकार यांनी या कार्यक्रमाच्या संयोजनात मदत केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com