Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांचा पुन्हा चलो दिल्लीचा नारा, १०१ शेतकऱ्यांचा गट कूच करणार

Kisan Andolan Delhi March Updates : हमीभावासह इतर मागण्यांसाठी आंदोलन दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आता १०१ शेतकऱ्यांचा गट पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्यासाठी तयार आहे.
Delhi Farmers Protest
Delhi Farmers ProtestAgrowon
Published on
Updated on

Pune News : हमीभावासह विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे १०१ शेतकरी पायी निघाले आहेत. पण त्यांना दिल्लीत जाण्यापासून उत्तप प्रदेश पोलिसांनी आडवत अश्रुधुराचा मारा केला. यानंतर केंद्र सरकारकडून शनिवारी शेतकऱ्यांशी कोणतीच चर्चा झाली नाही. यामुळे आता किसान मजदूर मोर्चा आणि एसकेएमच्या नेतृत्वात शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करतील. शेतकरी आज (ता.८) दुपारी १२ वाजता दिल्लीकडे निघतील. शुक्रवारी (ता.६) पंजाब-हरियाना सीमेवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराचा मारा केला होता. ज्यात काही शेतकरी जखमी झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी आपला पायी मोर्चा एका दिवसासाठी स्थगित केला होता.

पंजाबमधील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी फेब्रुवारीपासून शंभू सीमेवर आंदोलन करत आहेत. मात्र त्यांना पोलिस हरियाणाच्या पुढे जाऊ देत नाही. दरम्यान पुन्हा एकदा हमीभावासह भूसंपादन आणि नुकसान भरपाईच्या मागणीवरून पंजाब आणि हरियाणातील १०१ शेतकरी आणि १० शेतकरी संघटना नोएडा आणि गाझियाबाद रस्त्यावर उतरल्या.

Delhi Farmers Protest
Delhi Farmer Protest : ‘एमएसपी’साठी पुन्हा‘चलो दिल्ली’चा नारा !

६ डिसेंबरला शेतकऱ्यांनी दिल्ली चलो चा नारा दिला आणि पोलिस पुन्हा एकदा अलर्ट झाले. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पंजाब-हरियाणा सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली. बॅरिकेड्स लावण्यात आले आणि शुक्रवारी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. पण शेतकरी आपल्या मागणीवर ठाम असून ते आज पुन्हा दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

यावेळी शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी सांगितलं की, हमीभावासह भूसंपादन, नुकसान भरपाई आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र या मागण्यांबाबत केंद्राकडून चर्चेसाठी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही दिल्लीकडे पुन्हा मोर्चा काढणार आहोत.

१०१ शेतकऱ्यांचा एक गट आज दुपारी १२ वाजता दिल्लीकडे मार्गस्थ होणार आहे. केंद्राशी चर्चेसाठी शनिवारचा दिवस ठेवला होता. मात्र सरकारकडून याची दखल घेण्यात आली आणि नाही कोणतेही आमंत्रण. केंद्रीय मंत्री आणि त्यांचे नेते वेगवेगळ्या व्यासपीठांवर शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्याचा दावा करत आहेत.

Delhi Farmers Protest
Delhi Farmers' Protest : शेतकऱ्यांचा पुन्हा 'दिल्ली चलो'चा एल्गार!, दिल्लीच्या सीमा बंद

मात्र प्रत्यक्षात कोणीही पुढे येऊन बोलत नाही. म्हणून आम्ही आता पुन्हा एकदा दिल्लीकडे पायी कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध राहील, असेही पंढेर यांनी सांगितले. तर याआधी देखील कोणत्याही आंदोलनात आमच्याकडे अथवा शेतकऱ्यांकडे शस्त्रे नव्हती आणि आताही नाहीत, असाही उपरोधक टोला पंढेर यांनी टीका कारांना लगावला.

तसेच पंढेर म्हणाले की, राजपुरा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शेतकऱ्यांची बेट घेतली. शंभू सीमेवर पोलिसांनी केलेल्या अश्रुधुराच्या माऱ्यामुळे १६ शेतकरी जखमी झालेत. हरप्रीत सिंग आणि गुरिंदर सिंग या शेतकऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची ऐकण्याची क्षमता गेली असून चार शेतकरी वगळता सर्व शेतकऱ्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

Delhi Farmers Protest
Delhi Farmers' Protest : संसदेला घेराव घालण्याची शेतकऱ्यांची रणनीती; चिल्ला सीमेवर महाजाम

दरम्यान केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांनी राज्यसभेत एमएसपीबाबत विधान केले होते. यावरून पंढेर यांनी निशाना साधताना, कृषिमंत्र्यांनी केलेले विधान दिशाभूल करणारे आहे. शेतकरी हमीभावाची मागणी करत आहे. सरकारला कृषित देश प्रगत करायचा असेल तर शेतकऱ्याला पारंपरिक पीकचक्रातून बाहेर काढावे लागेल. त्यासाठी हमीभाव कायद्याची अमंलबजावणी करावी लागेल, असे म्हटले आहे.

हरियाणामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था

शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केल्यानंतर हरियाणा सरकारकडून सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. घग्गर नदीवर दक्षता वाढवण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अग्निशमन दल आणि ड्रोनच्या माध्यमातून अश्रूधुराचे नळकांड्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. तसेच खनौरी हद्दीतही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com