Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Forest fire in Uttarakhand : उत्तराखंडच्या जंगलात भीषण आग लागली असून आगीच्या ज्वाला नैनितालमधील हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे येथे लष्करासह, हवाई दलाला पाचारण करण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Fire in Nainital forest
Fire in Nainital forestAgrowon

Pune News : देशात उष्णतेच्या झळा बसत असतानाच उत्तराखंडमधील नैनिताल येथील जंगलात आगीच्या ज्वाला भडकल्या आहेत. रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारी भडकलेल्या आगीचे लोट आता नैनितालमधील हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह लष्कराचे जवान आणि हवाई दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. येथे एमआय-१७ हेलिकॉप्टरमधून आगीवर पाण्याचा मारा केला जात असून दिवसेंदिवस आग तीव्र होत आहे. तर नैनिताल ते भवलीपर्यंतचा रस्ता धुराच्या लोटाने गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

उत्तराखंडमध्ये शुक्रवारी वाढत्या तापमानामुळे ३१ आगीच्या मोठ्या घटना घडल्या असून सर्वात मोठी घटना नैनितालच्या लडियाकांतामध्ये उघडकीस आली आहे. यामुळे येथे वनविभागाचे कर्मचारी, अग्निशमन दल, पोलीस, लष्कर आणि हवाई दलाचे जवान आग विझविण्यासाठी धडपडत आहेत. मात्र सोसाट्याचा वाऱ्यामुळे आग आटोक्यात येत नसून आगीचा भडका उडत आहेत. यादरम्यान ही लागलेली आग हायकोर्ट कॉलनीच्या आसपास पोहोचली असून एमआय-१७ हेलिकॉप्टरमधून भीमताल तलावातील पाण्याचा मारा आगीवर केला जात आहे. तसेच नैनिताल तलावातील नौका विहार देखील थांबवण्यात आले आहे. 

Fire in Nainital forest
Forest Fire : कोल्हापुरात चार महिन्यांत ८० वणवे

नैनितालसह कुमाऊँच्या जंगलात आग लागली असून ही आग आता नैनितालमधील हायकोर्ट कॉलनीसह नैनितालच्या लष्करी भागात पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आगीमुळे बलदियाखान, जिओलीकोट, मंगोली, खुरपाताल, देवीधुरा, भवाली, पिनस, भीमताल मुक्तेश्वरसह आजूबाजूच्या जंगलाचे मोठे नुकसान झाले आहे. 

यावरून उच्च न्यायालयाचे सहाय्यक निबंधक अनिल जोशी यांच्या माहितीनुसार, द पाइन्सजवळील एका रिकाम्या घराला आग लागली. सध्या येथे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगीने भीषण रूप धारण केले असून हायकोर्ट कॉलनीतील रहिवाशांना धोका आहे. तर जिल्हा प्रशासनाने आगीच्या पार्श्वभूमीवर नैनी तलावातील नौकाविहारास बंदी घातली आहे.

३३.३४ हेक्टर वनक्षेत्र बाधित

यावेळी विभागीय वन अधिकारी चंद्रशेखर जोशी यांनी आगीची माहिची देताना, आग विझवण्यासाठी वन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दल, पोलीस, लष्कर आणि  हवाई दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. आम्ही आगीवर नियंत्रण आणण्यासाठी मानोरा रेंजचे ४० कर्मचारी आणि दोन वन परिक्षेत्राचे कर्मचारी तैनात केले आहेत. तर गेल्या २४ तासात येथील कुमाऊँ जंगलाला आग लागण्याच्या २६ घटना समोर आल्या असून गढवाल प्रदेशात ३३.३४ हेक्टर वनक्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्याचे सांगितले आहे. 

Fire in Nainital forest
Forest Fire : वणव्यात आंबा, काजूसह हजारहून अधिक झाडे जळाली

६८९.८९ हेक्टर वन क्षेत्राचे नुकसान 

तर पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या वर्षी १  नोव्हेंबरपासून राज्यात सतत आगीच्या घटना घडल्या आहेत. येथे ५७५ घटनांची नोंद झाली असून राज्यातील ६८९.८९ हेक्टर वन क्षेत्रातील नुकसान झाले आहे. यामुळे १४ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचेही पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

आग लावणाऱ्यांचा छडा 

दरम्यान रुद्रप्रयागमध्ये आग लावणाऱ्यांचा छडा लावण्यात प्रशासनास यश आले असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. नरेश भट्ट, हेमंत सिंग आणि भगवती लाल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. तर आतापर्यंत जंगलांना आग लावल्या प्रकरणी १९ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यापैकी १६ प्रकरणांचा तपास सुरू आहे. रुद्रप्रयागमधील जंगलातील आग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकाने ही कारवाई केली जात असून याच पथकाने नरेश भट्ट याला अटक केल्याचे रुद्रप्रयागचे विभागीय वन अधिकारी अभिमन्यू यांनी सांगितले आहे. 

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी 

यादरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आगीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व विभागांशी समन्वय साधून आग आटोक्यात आणवे असे सांगितले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com