Book Review: कृषी पर्यटनातील यशकथांची भेट

Krushi Paryatan Udyogachi Yashogadha Book : कृषी पर्यटन हे केवळ एक व्यावासिक संकल्पना नाही, तर शेतकऱ्यांसाठी नव्या मार्गाने उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणारे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. गणेश चप्पलवार यांनी "कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा" या पुस्तकात विविध कृषी पर्यटन केंद्रांच्या यशस्वी प्रवासाची माहिती दिली आहे.
Krushi Paryatan Udyogachi Yashogadha
Krushi Paryatan Udyogachi YashogadhaAgrowon
Published on
Updated on

Book Update:

कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा

लेखक : गणेश चप्पलवार

प्रकाशन : वल्लरी प्रकाशन, पुणे

पाने : १८३

मूल्य : ३०० रुपये

‘‘केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार।

शास्त्रग्रंथविलोकत, मनुजा चातुर्य येतसे फार।।’’

ही माणसाला शहाणपण कोठे कोठे भेटते, हे सांगणारी कवी मोरोपंतांची एक सुंदर कविता आहे. पंडितांशी मैत्री, सभेमध्ये संचार, शास्त्रग्रंथाचे वाचन यांसारख्या गोष्टीमध्ये त्यांनी देशाटनाचाही समावेश केलेला आहे. आपल्या देशामध्ये एकेकाळी देशाटन हे प्रामुख्याने धर्मस्थळांच्या यात्रांपुरते मर्यादित होते.

Krushi Paryatan Udyogachi Yashogadha
Tukayan Book Review : मनाचिये गुंती गुंफियेला शेला

आपला नियमित देश, स्थान सोडून अन्य ठिकाणी जाणे, इतकाच सामान्य अर्थ घेऊन पर्यटनाकडे पाहणे चुकीचे ठरेल. मात्र आता पर्यटनाने जे जगद्‌व्यापक स्वरूप धारण केले आहे. जगभरामध्ये पर्यटन हा स्वतंत्रपणेही एक मोठा उद्योग आहे.

पर्यटनाचे जे काही प्रकार पडतात, त्यात सामान्यतः धार्मिक पर्यटन, साहसी पर्यटन, समुद्र किनारे पर्यटन, देशानुसार केले जाणारे हिवाळी, उन्हाळी किंवा पावसाळी असे ऋतुनिहाय पर्यटन, ऐतिहासिक स्थान पर्यटन, निसर्ग पर्यटन, संस्कृती पर्यटन, वन, जंगले किंवा अभयारण्यांचे पर्यटन यासारखे अनेक प्रकार समोर येतात. माणसांच्या प्रवृत्तीप्रमाणे आणि आर्थिक स्थितीनुसार योग्य त्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाची निवड केली जाते. पण हा सारा अतिश्रीमंतांचा, नवश्रीमंतांचा हौसेचा, आवडीचा, कदाचित विरंगुळ्याचा खटाटोप असतो, असे कुणी म्हणेल.

गेल्या दशकांमध्ये वाढत चाललेल्या शहरीकरणामध्ये माणूस गावापासून तुटत चालला आहे. आज गावाकडून शहरात आलेली पहिली, दुसरी पिढी निदान गावाच्या, लहाणपणीच्या काही आठवणी घेऊन स्मृतिरंजनामध्ये जगताना दिसते. मात्र रोजच्या शहरी कामांच्या, नोकरीच्या धावपळीमध्ये जीवन जगणेच राहून जातेय, आपला मुलाबाळांना तर शेतीभाती, गावकुसातल्या साध्यासुध्या गोष्टीही माहिती नाहीत, हे जेव्हा समजते, तेव्हा ते ते दाखवण्याची मध्यमवर्गीयांची धडपड सुरू होते.

Krushi Paryatan Udyogachi Yashogadha
Sant Kabir Book Review: कबीर काव्य आणले मायबोलीत...

यातूनच गेल्या काही वर्षांमध्ये कृषी पर्यटन ही संकल्पना पुढे आलेली आणि रुजत गेलेली दिसते. शेतातच काही सुविधा उपलब्ध केल्यास शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नाचा स्रोत म्हणूनही याकडे पाहिले जाते. मोठमोठ्या शहरांच्या आसपास कृषी पर्यटन केंद्रे वाढत आहेत. मात्र बहुतेकांना सामान्य हॉटेल किंवा रिसॉर्ट यांपासूनचे कृषी पर्यटनाचे वेगळेपण नेमकेपणाने समजलेले दिसत नाही.

त्यातून व्यवसायात अनिष्ट प्रथापरंपराही काही प्रमाणात रुजलेल्या दिसतात. कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच कृषी पर्यटन व्यवसायामध्ये यशाइतक्याच अपयशाच्याही शक्यता गृहीत धराव्या लागतात. त्यातील खाचाखोचा जाणून त्या व्यवसायात उतरल्यास यशाच्या शक्यता वाढू शकतात, हे लक्षात घेऊन पर्यटक आणि शेतकरी व त्याचे कृषी पर्यटन केंद्र या दरम्यानचा दूवा म्हणून काम करणारी संस्था गणेश चप्पलवार या तरुणाने स्थापन केली. त्यांची ‘अॅग्रोटुरिझम विश्‍व’ ही संस्था शहरी लोकांना, कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना एकदिवसीय सहल, तंबूमधील निवास, शेताची -गावाची सहल, ट्रेकिंग, बोटिंग, फिशिंग यासारख्या सुविधांची माहिती व सेवा पुरवते. कृषी पर्यटनाविषयी मार्गदर्शन, प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करते.

त्यांनी राज्यातील सुमारे ३५० कृषी पर्यटन केंद्रांना भेटी देत, माहिती घेत, वेगवेगळे २६ निकषांची कसोटी लावत निवडलेल्या १४ कृषी पर्यटन केंद्रांची व उद्योजकांची माहिती देणारे कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मात्र यात उद्योजकांच्या यशोगाथांमधून फक्त उजळ, धवल गोष्टी समोर येतात.

मात्र या व्यवसायातील खाचाखोचा, अडचणी, सध्या विविध कारणांमुळे उद्‌भवत असलेल्या समस्याही तितक्याच ताकदीने येणे गरजेचे होते. अशा गोष्टी या पुस्तकात आल्या असत्या तर नव्याने या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते नक्कीच अधिक मार्गदर्शक ठरले असते. अर्थात, एका जागी १४ कृषी पर्यटन केंद्रांची माहिती उपलब्ध होते, हेही नसे थोडके!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com