Dam Water Stock : महिनाभरातच धरणांत १६.४१ टीएमसी पाण्याचा येवा

Water Storage : जून महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार, तर काही ठिकाणी कमी पाऊस पडला. पूर्व भागात पावसाचा जोर अधिक होता.
Dam Water Storage
Dam Water StorageAgrowon

Pune News : जून महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार, तर काही ठिकाणी कमी पाऊस पडला. पूर्व भागात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील २६ धरणांत नव्याने १६.४१ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा दाखल झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर पुन्हा दोन ते तीन दिवसांपासून अधूनमधून सरी बरसत आहेत. आतापर्यंत मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ३९२ मिलिमीटर, टेमघर धरण क्षेत्रात ३३७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे. त्यामुळे मुठा खोऱ्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

Dam Water Storage
Dam Water Storage : पावसाच्या उघडीपीने धरणातील पाणी आवक घटली

आता पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी शनिवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंत ०.७८ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. आतापर्यंत धरणात नव्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा दाखल झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली आहे. सध्या धरणांत एकूण उपयुक्त पाणीसाठा १५.६८ टीएमसी म्हणजेच आठ टक्के इतका आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणांत १५.३९ टीएमसी म्हणजेच सात टक्के एवढा पाणीसाठा होता.

यंदा साधारणपणे ७ जूनला मॉन्सून दाखल झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. या काळात जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी अधिक होता. मुठा खोरे, निरा, कुकडी आणि भीमा खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला.

Dam Water Storage
Dam Water Level : गिरणा धरणातील पाणीसाठा घटला

नीरा आणि भीमा नदीच्या कार्यक्षेत्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. यात उजनी धरणक्षेत्रात १५८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. उजनी धरणात सर्वाधिक पाण्याची आवक झाली आहे. आतापर्यंत उजनीत ९.४५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. यामुळे उजनीतील पाणीसाठा उणे २२.६९ टीएमसी म्हणजेच उणे ४२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

१ ते २९ जून या कालावधीत धरणनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

वरसगाव १९५, पानशेत १९२, खडकवासला १३७, पवना २२०, कासारसाई १२१, कळमोडी १०८, चासकमान १२९, भामा आसखेड ९८, आंध्रा १२४, वडीवळे १७९, नाझरे २१७, गुंजवणी २६७, भाटघर १३५, नीरा देवघर १९२, वीर १२३, पिंपळगाव जोगे ३९, माणिकडोह ६२, येडगाव १७५, वडज ५९, डिंभे ११०, चिल्हेवाडी ७०, घोड २०३, विसापूर १०५, उजनी १५८, मुळशी ३९२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com