Krishi Sakhi Scheme : देशातील ९० हजार महिलांना 'कृषी सखी'चं प्रशिक्षण देणार : केंद्रीय कृषिमंत्री चौहान

Minister of Agriculture and Rural Development : कृषी क्षेत्रात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रशिक्षित महिला शेतकऱ्यांना सल्ला देण्याचं काम करू शकतील. त्याच्या मोबदल्यात शेतकरी कृषी सखींना पैसे देतील.
Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh ChouhanAgrowon
Published on
Updated on

Shivraj Singh Chouhan : देशातील ९० हजार महिलांना कृषी सखीचं प्रशिक्षण देण्याची घोषणा केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी (ता. १५) केली आहे. ग्रामीण भागातील महिलांना यामध्ये विविध शेती काम आणि तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

त्यानंतर प्रशिक्षित महिला शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतीबद्दल मार्गदर्शन करतील, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. तसेच शेतकऱ्यांना विविध कामात मदत करून एका वर्षात ६० ते ८० हजार रुपये या महिला कमवू शकतील, असा दावा चौहान यांनी केला आहे.

चौहान म्हणाले, "शेतकऱ्यांना शेतीकामात मदत करण्यासाठी आम्ही अनेक महिलांना प्रशिक्षित केलं आहे. ३४ हजार महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं. आम्ही त्यात वाढ करत ९० हजार महिलांना प्रशिक्षण देणार आहोत. यामध्ये अनेक महिला बचत गटातील आहेत. त्यामुळे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला आहे." असं चौहान यांनी सांगितलं.

Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh Chauhan : "पूर्णपणे शेतकरीभिमुख कामांवर लक्ष केंद्रित करा" : शिवराजसिंह चौहान यांच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश

केंद्र सरकारने लखपती दीदी योजनेंतर्गत तीन कोटी लखपती महिला निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यामध्ये महिलांना ड्रोनचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

याच योजनेच्या अंतर्गत देशातील १२ राज्यांमध्ये कृषी सखी कार्यक्रम राबवला जात आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, राजस्थान, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेश आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे.

कृषी क्षेत्रात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रशिक्षित महिला शेतकऱ्यांना सल्ला देण्याचं काम करू शकतील. त्याच्या मोबदल्यात शेतकरी कृषी सखींना पैसे देतील. त्यामुळे कृषी विस्तार अधिक व्यावहारिक होईल, असा विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ जून रोजी उत्तरप्रदेशमधील वाराणसीमध्ये पीएम किसान योजनेचा १८ वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. तसेच ३० हजारहून अधिक महिला बचत गटांना कृषी सखी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com