Solar Energy : सौरऊर्जेच्या अट्टाहासाचा दीड हजार शेतकऱ्यांना फटका

Agriculture Solar Pump : ‘महावितरण’कडे वीज मागणीसाठी पैसे भरले मात्र सौरऊर्जेअभावी शेतकऱ्यांना पंप सुरू करता आलेला नाही. राज्य शासनाने मुख्यमंत्री कृषी सौरपंप योजना आणली.
Solar Power
Solar Energy Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : शेतकऱ्यांनी नदीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करावा. अन्यथा पाणी घेऊ नये, अशी अट घातल्याने जिल्ह्यातील दीड हजारांवर शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार ते दीड-दोन लाखांची साधन सामुग्री बसवूनही ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा करता येणे मुश्कील झाले आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.

‘महावितरण’कडे वीज मागणीसाठी पैसे भरले मात्र सौरऊर्जेअभावी शेतकऱ्यांना पंप सुरू करता आलेला नाही. राज्य शासनाने मुख्यमंत्री कृषी सौरपंप योजना आणली. त्यातून पुरेशी वीज वापरात येईल.

शेतीला सध्या रात्रीचा पाणीपुरवठा करताना शेतकऱ्यांची होणारी कसरत दूर होईल. शेतीला पाणी पुरवठा सक्षम होईल, असे अनेक दावे शासनाने केले. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी सौरऊर्जेसाठी काहींनी नियमित विजेसाठी महावितरणकडे पाठपुरावा सुरू केला.

Solar Power
Gokul Solar Energy Project : सोलापूर जिल्ह्यात ‘गोकुळ’ करणार सौरऊर्जा निर्मिती

जिल्ह्यातील शेतीसाठी गावाजवळच्या नदीतून, कालव्यातून पाणी घ्यावे लागते. त्यासाठी शेतकऱ्यांनी नदीवर वीज पंप बसवले. त्यासाठी नदीपासून शेतीपर्यंत दोन-तीन किलो मीटर अंतराची पाइपलाइन केली तसेच जलसंपदा विभागाकडून पाणीउपसा परवाना घेतला. यात जवळपास ५० हजार ते दीड लाखांचा खर्च झाला.

मात्र महावितरणकडे विजेची मागणी केल्यानंतर सौरऊर्जेवरील वीज मोटर घ्या, सौर पॅनल उभे करावे तरच पाणीपुरवठ्यासाठी वीज घेता येईल. नियमित वीज महावितरणकडून मिळणार नाही. त्यासाठी वाहिनी मिळणार नाही, असे सांगण्यात आले. परिणामी शेतकऱ्यांनी पाइपलाइन टाकली. विद्युत मोटर्स बसविल्या काहींनी वापरातील मोटर्सची डागडुजी करून घेतली. मात्र वीज मिळत नाही, त्यामुळे शेतीला पाणीपुरवठा करता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Solar Power
Solar Project : सौरऊर्जा प्रकल्पामुळे दूध उत्पादक सभासदांना होणार फायदा

अशात काही शेतकरी सौरऊर्जा घेण्यास तयार आहेत, मात्र त्यांना आवश्यक ती साधने देण्यात महावितरणकडून विलंब होत आहे. असा अनुभवही काही शेतकरी सांगत आहेत. अशा स्थितीत नदीत पाणी आहे, धरणात पाणी आहे, जवळपास शेती आहे, विद्युत साधणे आहेत त्यासाठी शेतकऱ्यांनी खर्च केला असूनही शेतीसाठी पाणी वापरता येत नाही, अशी स्थिती आहे.

दरम्यान, शेतीपंपासाठी सौरऊर्जेचा वापर करावा, असे शासनाचेच धोरण आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा वापर करावा लागणार आहे. पारंपरिक वीज पुरवठा देणे तूर्त आदेश आलेले नाहीत, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

नदीच्या पाण्यावर जलसंपदा विभागाने किती हक्क दाखवावा तसेच महावितरणकडून सौरऊर्जेसाठी शेतकऱ्यांना सक्ती का करावी?, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. वास्तविक शेतीसाठी वीज वापरात सौरऊर्जेशिवाय अन्य पर्यायी वीज वापरण्याचा मुद्दाच महावितरणने शिल्लक ठेवलेला नाही, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडून सौरऊर्जा पॅनेल बसवलेली नाहीत, अशा शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करता येणे मुश्कील झाले आहे.
- विक्रांत पाटील, अध्यक्ष, इरिगेशन फेडरेशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com