Poultry, Duck Keeping Lessons : गडचिरोली जिल्ह्यातील ८६ युवकांनी घेतले कुक्कुट, बदकपालनाचे धडे

UDAN PM Scheme : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने प्रोजेक्ट उडान योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ८६ युवक -युवतींना कुक्कुट व बदकपालनाचे प्रशिक्षण देण्यात आले.
Poultry and Duck
Poultry and Duck Agrowon

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने प्रोजेक्ट उडान योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ८६ युवक -युवतींना कुक्कुट व बदकपालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. या तीनदिवसीय प्रशिक्षणानंतर त्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यातील माओवादग्रस्त क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना गडचिरोली पोलिस दल व कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने इच्छुक युवक-युवतींना तीनदिवसीय कुक्कुटपालन व बदकपालन प्रशिक्षण देण्यात आले.

हे दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ पोलिस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे पार पडला. या निरोप समारंभाला अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे मुख्य नियंत्रक डॉ. प्रमोद पाटील,

Poultry and Duck
Poultry Farm Business : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेमुळे पोल्ट्री उद्योगाला नवसंजीवनी; पाहा किती आहे सबसिडी

कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) डॉ. विक्रम कदम, सहायक प्राध्यापक (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) डॉ. सचिन रामटेके, डॉ. महातळे व डॉ. खोब्राागडे उपस्थित होते. गडचिरोली पोलिस दलाच्या पुढाकाराने बदकपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षणामध्ये उपविभाग गडचिरोली, पेंढरी, कुरखेडा व धानोरा येथील ८६ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या प्रशिक्षणात तज्ज्ञांमार्फत बदक व कुक्कुटांचे चारा व्यवस्थापन व लसीकरणासंदर्भात प्रशिक्षण व उद्‌बोधन करून बदकपालन व कुक्कुटपालन व्यवसाय उभारण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ही दोन्ही प्रशिक्षणे यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर बदकपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्याकरिता प्रत्येकी २५ बदकांचे व कोंबडीचे पिल्ले, प्रत्येकी १० किलोप्रमाणे खाद्य व इतर साहित्य वाटप करून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Poultry and Duck
Poultry Market : घाऊक बाजारात कोंबड्यांचे दर दबावात

यावेळी अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख म्हणाले की, कुक्कुटपालन व बदक पालन हा व्यवसाय शेतीला पूरक म्हणून शेतक­ऱ्यांनी केला पाहिजे. तसेच धानाचे पिकासोबतच इतर नगदी पिके घ्यावी व गडचिरोली पोलिस दलाच्या कृषी दर्शन सहलीच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या भेटीदरम्यान घेतलेल्या अनुभवांचा फायदा घेऊन त्यांनी आपली आर्थिक प्रगती करावी, असे आवाहनही केले.

या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्राचे सर्व अधिकारी, अंमलदार, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक धनंजय पाटील, पोलिस उपनिरीक्षक भारत निकाळजे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके व अंमलदारांनी सहकार्य केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com