Aslam Abdul Shanedivan
ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म उद्योग सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून 50 टक्क्यांच्या सबसिडीसह ५० लाखो रूपयांचे कर्ज दिले जात आहे
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याअंतर्गत राष्ट्रीय पाळीव पशू कार्यक्रमातंर्गत मांस, दूध आणि अंड्यांच उत्पादन वाढवण्याच्या हेतूने ही योजना सुरू केली आहे
ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म विकसित करण्यासाठी सरकारकडून 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. यावर 50 टक्के सबसिडी मिळते.
या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती, बचत गट, उद्योजक, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, या यापैकी कोणालाही कर्ज मिळू शकते. हे कर्ज राष्ट्रीयकृत बँक देते.
या योजनेसाठी नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तर कर्जदाराच्या नावे कमीत कमी शेतजमीन असावी लागते.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी nlm.udayanidhimitra.in/Login या पोर्टलला भेट द्यावी
आवश्यक फॉर्म, सविस्तर प्रकल्प अहवाल, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, प्रकल्पाच्या जागेचे फोटो, जमिनीची कागदपत्रे, बँके खात्याचे दोन कॅन्सल चेक, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र (गरजेचे असल्यास), कौशल्य प्रमाणपत्रे आणि स्कॅन सही