Poultry Market : घाऊक बाजारात कोंबड्यांचे दर दबावात

Wholesale Chicken Rate : राज्यात सुमारे ९ लाखावर पोल्ट्री व्यवसायिक आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून स्वतंत्र त्यासोबतच कंपन्यांकडून पक्षी, औषधे आणि खाद्य घेत करारावर हा व्यवसाय करणाऱ्यांचादेखील यामध्ये समावेश आहे.
Poultry Market
Poultry MarketAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : बाजारात अधिक वजनाच्या पक्ष्यांचा पुरवठा करीत बाजारात आवक वाढती आणि मागणी कमी असल्याचे चित्र निर्माण करत करारावरील कुक्‍कुपालन करणाऱ्या कंपनीकडून कृत्रिमपद्धतीने दर पाडले जात असल्याचा आरोप शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांकडून करण्यात येत आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर अशा प्रकरणात राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने हस्तक्षेप करीत तोडगा काढावा, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे. सध्या राज्यात घाऊक पक्ष्यांचे दर प्रतिकिलो ४५ ते ५० रुपयांवर आहेत.

राज्यात सुमारे ९ लाखावर पोल्ट्री व्यवसायिक आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून स्वतंत्र त्यासोबतच कंपन्यांकडून पक्षी, औषधे आणि खाद्य घेत करारावर हा व्यवसाय करणाऱ्यांचादेखील यामध्ये समावेश आहे.

Poultry Market
Poultry Business : पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत

दरम्यान कंपन्यांकडून अधिक नफा कमविण्याच्या उद्देशाने जादा वजनाचे पक्षी बाजारात विक्रीसाठी आणले जात आहेत. यामुळे बाजारात आवक अधिक आणि त्या तुलनेत मागणी कमी असल्याचे चित्र निर्माण होते, यातूनच बाजार गडगडतो.

Poultry Market
Poultry Business : पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रश्‍न सोडवा, अन्यथा आंदोलन

सध्या घाऊक बाजारात पक्ष्यांची उचल अवघ्या ४५ ते ५० रुपये किलो दराने होत आहे. त्या तुलनेत उत्पादकता खर्च मात्र प्रतिकिलो ९० रुपये आहे. परिणामी उत्पादकता खर्चाच्या तुलनेत निम्म्या दरानेच पक्ष्यांची विक्री होत असल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. गेल्यावर्षी पक्ष्यांचे घाऊक दर १२० रुपये किलो होते. या वेळी मात्र १०० रुपयांपेक्षा कमी दराने याचे व्यवहार होत आहेत.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ. मुकुंद कदम यांनी संशोधन करीत २ ते २.१५ किलो वजनाच्या कोंबडीचे मांस हे पौष्टिक आणि चवीला योग्य असल्याचा दावा केला आहे. तसा अहवाल देखील त्यांनी प्रसिद्ध केला आहे. मात्र कंपन्या आपल्या फायद्यासाठी तीन किलोपेक्षा अधिक वजनाचे पक्षी बाजारात आणतात. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या आमच्यासारख्या लाखो शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. परिणामी शासनाने यात हस्तक्षेप करावा.
- शुभम महाले, पोल्ट्री व्यवसायिक, शिवपूर, ता. अकोट, अकोला.
राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर या मुद्यावर चर्चा झाली. त्या वेळी ‘माफसू’चा अहवाल मागण्याचे ठरले. परंतु त्यानंतर कार्यवाही शून्य आहे. याचा फटका कुक्‍कुटपालकांना बसत असल्याने या प्रकरणात शासनाने वेळीच हस्तक्षेप करावा. अन्यथा अमरावती पोल्ट्री व्यावसायिक संघ या विरोधात तीव्र लढा पुकारेल.
- अतुल पेरसपुरे, समन्वयक, अमरावती जिल्हा पोल्ट्री व्यवसायिक संघ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com