Pre-Monsoon Rains : राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह वळवाचा हैदोस, शेतीचे मोठे नुकसान

Pre-Monsoon Rains Damage Agriculture : पश्चिम बंगालमध्ये आलेल्या ‘रेमल’ चक्रीवादळाचा परिणाम राज्यात दिसून आला. रविवारी सायंकाळनंतर अनेक ठिकाणी वळवाने हजेरी लावत वादळी वाऱ्यांमुळे शेतीसह घरांचे मोठे नुसकान झाले आहे.
Pre-Monsoon Rains
Pre-Monsoon RainsAgrowon
Published on
Updated on

Pune News : चक्री वादळ रेमल रविवारी (ता.२६) रात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर पोहोचले. ज्यामुळे येथे ताशी १३५ किमी वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस झाला. येथे शेतीचे नुकसान झाले असून वादळामुळे झाले उन्मळून पडली आहेत. तर रेल्वे आणि विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. यादरम्यान रेमल वादळाचा परिणाम महाराष्ट्रात दिसून आला. राज्यातील अनेक भागात रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे मराठवाड्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून विविध ठिकाणी जीवितहानी झाली आहे. तसेच पशूधन देखील दगावले आहे.

मराठवाड्यात शेतीसह घरांचे नुसकान

मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, जळगाव, धाराशिव, अकोल्यातील विविध तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

केळीच्या भागा भुईसपाट

धानोरा शिवारात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे केळीच्या भागा भुईसपाट झाल्या. तर औसा तालुक्यातील धानोरा शिवारात देखील असणारी तिन एकर केळीची बाग भुईसपाट झाली. याचबरोबर येथील पत्रे वादळात उडून गेली. तर मोठ्या प्रमाणात झाडेही उन्मळून पडली.

Pre-Monsoon Rains
Pre Monsoon Rain : रायगड जिल्ह्याला पूर्वमोसमीचा तडाखा

धाराशिवमध्ये एकाचा मृत्यू

धाराशिव येथील सांगवीत वादळी वाऱ्याचा फटका एका व्यक्तिला बसला. येथे घरावरील पत्रे उडून गेल्याने दगड डोक्यात पडून हनुमंत कोळपे या व्यक्तिचा मृत्यू झाला. यानंतर घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच महसूल, आरोग्य आणि पोलीस प्रशासनाला पंचनामा करण्याच्या सूचना केल्या.

जळगावात केळीची बाग जमीनदोस्त

जळगावच्या जामनेर येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळीची बाग जमीनदोस्त होऊन तब्बल पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच यावल तालुक्यात घर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. ही घटना यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील थोरपाणी या आदिवासी पाड्यावर घडली. नानसिंग गुना पावरा (वय-२८), सोनाबाई नानसिंग पावरा (वय-२२), रतीलाल नानसिंग पावरा (वय ३) बाली नानसिंग पावरा (वय २) अशी मयत सदस्यांची नावे आहेत. तर हे चारही शव यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहेत.

गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी

दरम्यान जिल्ह्यातील पातोंडी, तांदलवाडी, देऊळगाव, तोरनाळा, पळासखेडा काकर, गोरनाळा,मनूर व चिंचखेडा सिम येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या वळवामुळे केळी पिकासह राहत्या घरांचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. यावरून कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. तसेच नुकसानीचे पंचनामे करून सर्व बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी कारवाई करावी अशा सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

लातूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

लातूरमध्ये देखील रविवारी चक्रीवादळ, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागात नुकसान झाले. वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना चाकूर तालुक्यातील महाळंगी शिवारात रविवारी सायंकाळी घडली. शिवाजी नारायण गोमचाळे (वय-३८) आणि मोलमजुरी करुन आपल्या घर प्रपंच भागविणारे ओमशिवा लक्ष्मण शिंदे (वय-३५) असे वीज पडून दगावलेल्या तरूणांची नावे आहेत. यामुळे महाळंगी

Pre-Monsoon Rains
Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर

लातूर-निलंगा महामार्ग बंद

लातूर निलंगा महामार्गावर सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे बाभळीचे झाड पडल्याने मार्ग बंद झाला होता. यामुळे वाहतूक खोळंबली होती. तर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ, निलंगा व लातूर तालुक्यांना रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. यावेळी येथे प्रत्येकी एक एक जनावर दगावले.

अकोल्यात सोसाट्याचा वारा

अकोला जिल्ह्यात अनेक भागात पारा ४५ पार गेला असतानाच रविवारी सायंकाळी ढगाळ वातावरण झाले. तसेच सोसाट्याचा वारा सुटल्याने काही घरांचे पत्रे उडून गेले. तर अकोट आणि तेल्हारा तालुक्यात केळी पिकाला फटका बसला.

माढ्यात झाडें उन्मळून पडली

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळ सोलापूरच्या माढ्यात प्रचंड नुकसान झाले. माढ्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. येथे विविध ठिकाणी मोठं मोठी झाडे उन्मळून पडल्याने घरांचे नुकसान झाले. तसेच जोरदार झालेल्या पावसाने शेतात पाणी साचले. यामुळे पिकांचे नुकसान झाले. दरम्यान मोहोळ तालुक्यातील देवडी फाट्यावर पेट्रोल पंपाचे छत कोसळले. मात्र दैवबलवत्तर म्हणून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर परिसरातील अनेक घरावरचे पत्रे उडाले आहेत.

पोलीस ठाण्याला वादळाचा फटका

वादळी वाऱ्यासह वळवाचा फटका मलकापूर पोलीस ठाण्याला बसला. पोलीस ठाण्यावरील पत्रे उडाली असून संगणक, लॅपटॉपचे नुकसान झाले आहे. तसेच महत्वाचे मानले जाणारे क्राईम रेकॉर्ड भिजले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com