Pre monsoon Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपलं; आंब्याचे नुकसान, भाजीपाला पिकांना दिलासा

Agricultural Crops : नदीपात्रांमध्ये पाणी नसल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे धडपड सुरू होती. वळीवमुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.
Stormy Rain Kolhapur
Stormy Rain Kolhapuragrowon

Kolhapur Heavy Rain : कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात अचानक वादळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. सोसाट्याचा वारा आणि गारांच्या पावसाने पाण्याची आस लागलेल्या पिकांना दिलासा मिळाला तर काही ठिकाणी वाऱ्यामुळे घरांची पडझड पहायला मिळाली.

सांगली-जयसिंगपूर मार्गावर सुमारे ४० झाडे कोसळली. रेल्वे मार्गावर झाड कोसळल्याने एक तासभर रेल्वे वाहतूक खोळंबली होती. खबरदारी म्हणून महावितरणकडून विजपुरवठा खंडीत करण्यात आला होता तर जोरदार पावसाने उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला.

महिन्याभरापासून हवेतील उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढत होता. या परिसरात पारा ३९ अंशांवर गेल्याने अंगाची लाही लाही होत होती. काल (दि.१७) अचानक दुपारी दोननंतर ढगाळ वातावरणाला सुरुवात झाली. चारच्या सुमारास सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि गारांच्या वर्षात वळीव पावसाने सुरुवात केली.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसात भिजत गारा वेचण्याचा आनंद बालचमूसह अनेकांनी लुटला. सुमारे तासभर कोसळणाऱ्या या पावसाने हवेत मोठ्या प्रमाणावर गारवा निर्माण केला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून शहरात विविध मार्गावरील वीज वाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या फांद्या तोडल्या. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने शहरात वीज वाहिन्या तुटण्याच्या घटना घडल्या नाहीत.

काही घरांमध्ये घुसले पाणी सखल भागातल्या काही घरांमध्ये पावसाचे गटारीतून वाहून आलेले पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ झाली. घरातील पाणी बाहेर काढण्याबरोबरच तुंबलेल्या गटारी प्रवाहित करण्यासाठी नागरिकांचे धडपड सुरू होती.

पिकांना जीवदान

वळवाने भाजीपाल्यासह इतर पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील नदीपात्रांमध्ये पाणी नसल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे धडपड सुरू होती. वळीवमुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

गटारी वाहिल्या रस्त्यावरून

दमदार पावसामुळे गटारी तुडुंब झाल्या आणि शहराच्या प्रमुख मार्गावरून पाणी वाहू लागले. गटारीतील पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्यांवर विखुरल्या. पाण्याच्या प्रवाहात गटारींचा अंदाज न आल्याने शहरात काही ठिकाणी मोटारसायकल गटारीमध्ये गेल्याने किरकोळ अपघात झाले.

आंब्याची गळती पावसाने आंब्याचे मोठे नुकसान

लहरी हवामानामुळे आधीच गावठी आंब्याला यंदा कमी मोहोर होता. धुके आणि ढगाळ वातावरणामुळे फळ गळतीचे प्रमाण वाढले होते. त्यातून तरलेला आणि काढणीला आलेला आंबा आज झडला आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

गारांसह दमदार वळीव

सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वारे, गारपीटसह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. त्याने येथील आठवडा बाजारात व्यापारी, भाजी विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

कुरुंदवाडमध्ये वीज खंडित कुरुंदवाड शहर व परिसरात वळवाने दमदार हजेरी लावली. वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य होते. दुसरीकडे व्यापारी, शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शहरासह नृसिंहवाडी, आलास, बुबनाळ, गणेशवाडी, खिद्रापूर, टाकळी, दत्तवाड परिसरातही पाऊस झाला.

गडहिंग्लजला अर्धा तास सरी

पंधरवड्यापासून हुलकावणी देणाऱ्या वळवाने अखेर आज हजेरी लावली. दुपारी तीनच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. फार जोर नव्हता; पण सुमारे अर्धा तास सरी कोसळत होत्या. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला. सकाळपासूनच उष्मा वाढला होता. प दुपारनंतर आभाळ भरून आले. तीनच्या सुमारास पाऊस सुरू झाला. अधेमधे विजांचा कडकडाट होत होता. पूर्वेकडील जरळी, नूल परिसरातही पाऊस कोसळला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com