Nashik Grapes Export : नाशिक जिल्ह्यातील ७ हजार ५०० टन द्राक्ष विदेशात

Grapes Export Nashik : नाशिक जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. सध्या द्राक्ष काढणीचा सिझन सुरू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातून ३ महिन्यांत ७ हजार ५६३ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे.
Nashik Grapes Export
Nashik Grapes Exportagrowon
Published on
Updated on

Nashik Grapes Exportes Farmers : नाशिक जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. सध्या द्राक्ष काढणीचा सिझन सुरू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातून ३ महिन्यांत ७ हजार ५६३ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. युरोपियन देशांसह चीन, श्रीलंका, रशियाकडून भारतीय द्राक्षांची मागणी वाढली आहे. याचबरोबर द्राक्षाला प्रतिकिलो ८० ते १२० रुपये भाव मिळत असल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र सुमारे ५८ हजार ३६७ हेक्टर आहे.

यात निफाड तालुक्यात २२ हजार हेक्टर, दिंडोरीत १५ हजार ७५८, नाशिकमध्ये ११ हजार ६७१ आणि चांदवड तालुक्यात ५ हजार १४८ हेक्टर क्षेत्र आहे. याव्यतिरिक्त बागलाण व कळवणमध्ये द्राक्षाची लागवड होते. २०२३-२४ च्या हंगामातील निर्यातीची पार्श्‍वभूमी विचारात घेऊन कृषी विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात १ लाख ६० हजार टन निर्यातीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्यापैकी युरोपियन देशांना १ हजार १४५ टन निर्यात झाली, तर इतर देशांमध्ये ६ हजार ४१८ टन निर्यात झाली आहे.

Nashik Grapes Export
Sangli Grape Market : सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची निर्यात घटणार, नैसर्गिक आपत्तीचा फटका

नाशिक जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कैलास शिरसाठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''द्राक्ष निर्यातीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. निर्यातदार शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करायला हवी. त्यातून व्यापाराला चालना मिळते आणि शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळतो.''

५ नोव्हेंबर २०२४ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान ही निर्यात झाली. आतापर्यंत जिल्ह्यातून १० हजार ३०० शेतकऱ्यांनी १० हजार २५३ हेक्टर क्षेत्रासाठी नोंदणी केली आहे. या वर्षी द्राक्षाला अवकाळीचा काही प्रमाणात फटका बसला.

मात्र, निर्यातीला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना होणारा तोटा भरून निघेल. आयात करणाऱ्या देशांमध्ये रशियन व युरोपियन देशांचा सर्वाधिक वाटा आहे. त्यांना अपेक्षित द्राक्ष निफाड व दिंडोरीत उत्पादित होत आहेत. या तालुक्यांमधून सर्वाधिक निर्यातीची शक्यता आहे.

युरोपियन देश, (द्राक्ष टनात)

बहरिन १४१, जर्मनी १२९, लाटविया १५, हॉलंड/नेदरलँड ८४८, युके १२. एकूण - ११४५

युरोपियन देशाव्यतिरिक्त होणारी द्राक्षांची निर्यात

चीन ३८, हाँगकाँग २०, इराक १५८, कुवेत १३, मलेशिया ६२६, ओमान १००, कतार ९३, रशियन फेडरेशन २७८४, सौदी अरब ४२४, सोमालिया १३, श्रीलंका १८, थायलंड ९३, युक्रेन ३६, यूएई १७९६. एकूण - ६४१८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com