10th Exam
HSC Exam Agrowon

HSC Exam : अहिल्यानगर जिल्ह्यात ६९ हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला सामोरे

10th Exam Maharashtra : दहावीच्या परीक्षेला अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवारपासून (२१ फेब्रुवारी) सुरुवात होत आहे.
Published on

Ahilyanagar News : दहावीच्या परीक्षेला अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवारपासून (२१ फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून विशेष पथकाकडून वेब कास्टिंग मॉनिटरिंग, ड्रोन कॅमेरे, व्हिडिओ शूटिंग, पोलिस गस्ती पथक, बैठे पथक आदी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

परीक्षा कामकाजात गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. यंदा जिल्ह्यात १८४ केंद्रांवर ६८,९११ विद्यार्थी परीक्षा देणार असून सात भरारी पथके नियुक्त आहेत. यंदा जिल्ह्यात ३० संवेदनशील केंद्रे आहेत.

10th Exam
SSC Exam 2025: आजपासून दहावीची परीक्षा १६ लाख ११ हजार विद्यार्थ्यांची नोंद

परीक्षा कालावधीत अनावश्यक लोकांनी परीक्षा केंद्र परिसरात फिरकू नये. विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रांवर शांतता ठेवावी; अन्यथा कडक कारवाई केली जाईल. सर्व परीक्षा केंद्रावरील खोल्यांचे वेबकास्टिंग मॉनिटरिंग जिल्हाधिकारी कार्यालयातील बाररुममधून विशेष पथकामार्फत होत आहे.

तेथील हालचाली टिपून रेकॉर्डिंग जतन करून ठेवले जात आहे. गैरप्रकार आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिला आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्ह्याचे पालकमंत्र्यांचेही आवाहन जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

10th Exam
HSC Exam 2025 : बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत

२१ फेब्रुवारी रोजी राज्य परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होत आहे. परीक्षेच्या कामकाजाचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. परीक्षेच्या कामकाजात कोणीही कुचराई केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिला आहे.

पोलिसांच्या गस्ती पथकाची नियुक्ती

यंदा कॉपीमुक्त अभियानासाठी उपाययोजना राबवली जात असून जिल्हाधिकारी कार्यालयातून विशेष पथकाकडून वेबकास्टींग मॉनिटरिंग केले जात आहे. गैरप्रकारात सहभागी शाळेची मान्यता रद्द करणे, संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याचे लक्ष, उपद्रवी परीक्षा केंद्रांवर पोलिसांचे गस्ती पथकाची नियुक्ती, उपद्रवी परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडिओ शूटिंग केले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com