SSC Exam 2025: आजपासून दहावीची परीक्षा १६ लाख ११ हजार विद्यार्थ्यांची नोंद

Maharashtra Board Exam: राज्यातील १६ लाख ११ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
SSC Exam
SSC ExamAgrowon
Published on
Updated on

Pune News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून (ता. २१) सुरू होत आहे. प्रथम भाषा असणाऱ्या विषयापासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधून दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील पाच हजार १३० मुख्य परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

यंदा आठ लाख ६४ हजार १२० विद्यार्थी, सात लाख ४७ हजार ४७१ विद्यार्थिनी आणि १९ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीची परीक्षा १७ मार्चपर्यंत असणार आहे. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहून नये, म्हणून गुरुवारपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तपास अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.

SSC Exam
SSC Exam : दहावीची परीक्षा झाली आणखी सोपी

त्यानुसार सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता, तर दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या परीक्षेतही पेपरच्या नियोजित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. राज्य मंडळातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. या वेळी सचिव देविदास कुलाळ उपस्थित होते.

मंडळाने नियोजित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय किंवा अन्य अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची परीक्षा लेखी परीक्षेनंतर १८ ते २० मार्च या कालावधीत ‘आउट ऑफ टर्न’ने आयोजित केली आहे.

SSC Exam
Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षांच्या जादूगार

विभागीय मंडळनिहाय विद्यार्थी संख्या :

पुणे : २,७५,००४

नागपूर : १,५१,५०९

छत्रपती संभाजीनगर : १,८९,३७९

मुंबई : ३,६०,३१७

कोल्हापूर : १,३२,६७२

अमरावती : १,६३,७१४

नाशिक : २,०२,६१३

लातूर : १,०९,००४

कोकण : २७,३९८

एकूण : १६,११,६१०

परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्सची दुकाने बंद

परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रांपासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्रांच्या परिसरात १६३ कलम लागू करण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com