Sangli Water Storage: सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत ६७ टक्के पाणीसाठा

Monsoon 2025: सांगली जिल्ह्यात मे आणि जून महिन्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे मध्यम व लघू प्रकल्पांत पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. जून महिन्याच्या मध्यावर ५१ टक्के इतका पाणीसाठा होता.
Sangli Water Storage
Sangli Water StorageAgrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती...

१) सांगली जिल्ह्यात मे-जूनमधील दमदार पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठा ६७% पर्यंत वाढला.

२) एका महिन्यात पाणीसाठ्यात तब्बल १६% वाढ झाली.

३) ८३ पैकी ३५ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले, ज्यात मध्यम ५ आणि लघू ७८ प्रकल्पांचा समावेश.

४) पाणीसाठा वाढल्याने जत व आटपाडीतील टँकरवर अवलंबित्व कमी होण्याची शक्यता.

५) मे-जूनमध्ये अनुक्रमे २३८ मिमी आणि १४८ मिमी पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा.

Sangali News: सांगली जिल्ह्यात मे आणि जून महिन्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे मध्यम व लघू प्रकल्पांत पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. जून महिन्याच्या मध्यावर ५१ टक्के इतका पाणीसाठा होता.

तर जुलैच्या मध्यावर हाच पाणीसाठा ६७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ८३ प्रकल्पांपैकी ३५ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अर्थात, एका महिन्यात १६ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला असल्याने बळीराजा सुखावला आहे.

Sangli Water Storage
Sangli Water Storage : सांगली जिल्ह्यातील पाणीसाठा २८ टक्क्यांवर

जिल्ह्यात मध्यम ५ व लघू ७८ असे ८३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ९३५३ दशलक्ष घनफूट असून, त्यामध्ये ७७७५ दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला होता.

Sangli Water Storage
Water Storage Sangli : सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट

त्यामुळे जत आणि आटपाडी तालुक्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. इतर भागात पाणीटंचाईची झळही वाढली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु मे महिन्यात २८ टक्के इतका पाणीसाठा महिन्याच्या जिल्ह्यात मेच्या मध्यापासून सर्वच तालुक्यांत मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.

मे महिन्यात २३८ मिलिमीटर इतका पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जून महिन्याच्या मध्यावर ५१ टक्के इतका पाणीसाठा झाला. अर्थात, मे अखेरच्या आठवड्याच्या तुलनेत वीस दिवसांत २३ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला.

जूनमध्ये १४८ मिलिमीटरची नोंद झाली. या पावसाने पुन्हा प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे. ८३ प्रकल्पांत ६४६८.३२ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला असून, त्यापैकी ५२०५.६४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न...

१) सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांचा पाणीसाठा किती आहे?
जुलैच्या मध्यावर पाणीसाठा ६७% झाला आहे.

२) सांगलीतील किती प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत?
८३ पैकी ३५ प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.

३) जिल्ह्यातील प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता किती आहे?
एकूण क्षमता ९३५३ दशलक्ष घनफूट आहे.

४) मे आणि जूनमध्ये किती पाऊस झाला?
मे महिन्यात २३८ मिमी तर जूनमध्ये १४८ मिमी पाऊस झाला.

५) या पावसाचा शेतकऱ्यांना कसा फायदा झाला?
प्रकल्प भरल्याने सिंचनासाठी व पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता वाढली आणि टंचाई कमी झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com