Water Storage Sangli : सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट

Water Storage Decline Sangli : सांगली जिल्ह्यात तब्बल १६४ टक्के जादा पावसाची नोंद झाली. जतमध्ये १३० टक्के, खानापूरमध्ये १४० टक्के आणि कडेगांवमध्ये १४३ टक्के वगळता इतर तालुक्यात १७५ टक्केपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
Water Storage Sangli
Water Storage Sangliagrowon
Published on
Updated on

Sangli Water : सांगली जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. एप्रिलच्या अखेरीस ८३ प्रकल्पांत १५६१ दशलक्ष घनफूट म्हणजे २० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जत तालुक्यातील २७ प्रकल्पांत पाच टक्के पाणी आहे. त्यामुळे तालुक्यात पाण्याची झळ वाढली आहे.

जिल्ह्यात तब्बल १६४ टक्के जादा पावसाची नोंद झाली. जतमध्ये १३० टक्के, खानापूरमध्ये १४० टक्के आणि कडेगांवमध्ये १४३ टक्के वगळता इतर तालुक्यात १७५ टक्केपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे डिसेंबरअखेर प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी शिल्लक होते. जिल्ह्यात पाच मध्यम आणि ७८ लघू प्रकल्प आहेत.

Water Storage Sangli
Kolhapur Sangli Rain : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला वादळी पावसाने नुकसान; सूर्यफूल शेतीचे नुकसान

या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ९४४० दशलक्ष घनफूट इतकी आहे. जिल्ह्यात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. जानेवारी महिन्यात ६३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. चार महिन्यांत तब्बल ४१ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. जत तालुक्यामध्ये २७ प्रकल्प आहेत.

जानेवारी महिन्यामध्ये जत तालुक्यात ११३० दशलक्ष घनफूट इतका उपलब्ध पाणीसाठा शिल्लक होता. तर दोन कोरडे तलाव आणि चार तलावांत मृत पाणीसाठा होता. चार महिन्यांत ९८६.९७ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या जत तालुक्यातील सहा प्रकल्प कोरडे पडले असून १३ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे. दरम्यान जिल्ह्यातील दहा प्रकल्प कोरडे तर १५ प्रकल्पामध्ये मृत पाणीसाठा आहे. ३२ प्रकल्पामध्ये २५ टक्के पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. काही दिवसांपासून पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटू लागला आहे.

तालुकानिहाय प्रकल्पातील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी

तासगाव ७ १०२.४२ १८

खानापूर ८ २०८ ३८

कडेगाव ७ ३१५.४३ ५०

शिराळा ५ २३७.६२ २७

आटपाडी १३ २९६.८९ २६

जत २७ १४३.०३ ५

कवठेमहांकाळ ११ २०१८७ २४

मिरज ३ ४८.६८ ४०

वाळवा २ ७.३९ १५

एकूण ८३ १५६१.३३ २०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com