Sangli Water Storage : सांगली जिल्ह्यातील पाणीसाठा २८ टक्क्यांवर

Water Level Sangli : जिल्ह्यातील ७८ लघू आणि पाच मध्यम प्रकल्पांमध्ये मे च्या सुरुवातीस १८ टक्के पाणीसाठा होता. उष्णतेची तीव्रता जास्त असल्याने पाणीसाठा घटला होता.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात गेल्या अकरा दिवसांत मॉन्सूनपूर्व पावसामुळे प्रकल्पांमधील पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढून २८ टक्के झाला आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा कमी झाल्या आहेत. मात्र जत तालुक्यात अवघा सहा टक्के पाणीसाठा आहे. यामुळे जत तालुक्यातील टंचाईच्या झळा तीव्रच आहेत.

जिल्ह्यातील ७८ लघू आणि पाच मध्यम प्रकल्पांमध्ये मे च्या सुरुवातीस १८ टक्के पाणीसाठा होता. उष्णतेची तीव्रता जास्त असल्याने पाणीसाठा घटला होता. मात्र गेल्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाने सर्व दूर हजेरी लावली. मात्र जत तालुक्यात पावसाने दडी मारली. इतर भागात मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात दहा टक्के वाढ झाली आहे.

Water Storage
Parbhani Water Storage : ‘येलदरी’त ४९.७४, तर सिध्देश्वर धरणात १६.३६ टक्के पाणीसाठा

जिल्ह्यात गतवर्षी तब्बल १६४ टक्के पावसाची नोंद झाली. यंदाही हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. गतवर्षी डिसेंबरअखेर जिल्ह्यातील लघू प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी शिल्लक होते. परंतु फेब्रुवारीपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या. यंदा नेहमीपेक्षा उन्हाळाही तीव्र होता. त्यामुळे पाणीसाठा गतीने घटला.

मे च्या सुरुवातीपर्यंत जिल्ह्यातील तलावांमधील पाणीसाठा १८ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. जिल्ह्यात एकूण पाच मध्यम आणि ७८ लघू प्रकल्प असे ८३ प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ९४४० दशलक्ष घनफूट आहे. जानेवारीमध्ये या प्रकल्पांमध्ये मिळून ६३ टक्के पाणीसाठा होता. तो चार महिन्यांत कमी होऊन १८ टक्क्यांवर आला होता.

Water Storage
Water Storage Systems : रस्त्यांवरील पाण्याचा संचय करणाऱ्या तंत्राची निर्मिती

जतमध्ये ६ टक्के पाणीसाठा

जत तालुक्यात सर्वाधिक २७ प्रकल्प आहेत. मे च्या सुरुवातीस १४१.४९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. तो आता १७०.६१ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. म्हणजे तालुक्यात केवळ सहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

तालुक्यातील सात प्रकल्प कोरडे पडले असून ११ प्रकल्पांत मृत पाणीसाठा आहे. मेच्या प्रारंभी जिल्ह्यातील ८३ पैकी तब्बल ६० तलावांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा होता. तर ९ तलाव कोरडे होते. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या तलावांची संख्या ४५ पर्यंत खाली आली आहे. तर पूर्ण भरलेल्या तलावांची संख्या पाच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com