Solar Agriculture Scheme : सौर कृषी वाहिनी अंतर्गत, कोल्हापूरच्या ६५ हजार शेतकऱ्यांना मिळणार वीज

Solar Electric : पायाभूत विद्युत सुविधांचे बळकटीकरण, विजेच्या हानीत घट, शेतीला दिवसा व योग्य भाराने वीजपुरवठा यातून होणार आहे.
Solar Agriculture Scheme
Solar Agriculture Schemeagrowon

Agricultural Irrigation Solar Scheme : राज्य शासनाकडून कृषी सिंचनाला चालना मिळण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. यातील प्रभावीपणे चालवली जाणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविली जात आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

'अभियान २०२५' अंतर्गत जिल्ह्यात ४४ उपकेंद्रांच्या ठिकाणी ९६५ एकर जमिनीवर १७० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सौर प्रकल्प उभारणीसाठी नियुक्त एजन्सीला जमीन हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

सौर प्रकल्पासाठी निवडलेल्या उपकेंद्रांचे बळकटीकरणामध्ये रिले बसविणे, ब्रेकर्स बसविणे, आर्थिंग करणे, बॅटरी व चार्जर व्यवस्था, खडीकरण, रंगरंगोटी आदी कामे प्रगतिपथावर आहेत.

या प्रकल्पामुळे ६५ हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा विजेची सोय होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात प्रकल्प कार्यान्वित झाला असेल, त्या ग्रामपंचयातींना पाच लाख प्रोत्साहनात्मक आर्थिक मदत तीन वर्षांसाठी देण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प

करवीर तालुक्यातील ३३/११ केव्ही उपकेंद्र कोगे (सौर प्रकल्प गावाचे नाव बहिरेश्वर ६ मेगावॅट- १२ हेक्टर), भामटे. गगनवाबडा : गगनबावडा (२ मेगावॅट- ५.८७ हेक्टर), मार्गेवाडी -निवडे. पन्हाळा : पडळ (माजगाव ५ मेगावॅट - १८ हेक्टर), बाजारभोगाव, सातवे, वेतवडे, पाटपन्हाळा (पाटपन्हाळा ३ मेगावॅट - ८.४५ हेक्टर), कळे (परखंदळे ५ मेगावॅट- १० हेक्टर), दिगवडे. शाहूवाडी : शाहूवाडी (कोळगाव २ मेगावॅट - ५.५१ हेक्टर), सरुड, वारुळ, मांजरे. कागल : सिद्धनेर्ली (बामणी ३ मेगावॅट - ५ हेक्टर), केनवडे. भुदरगड :

पिंपळगाव (बामणे ३ मेगावॅट- ६ हेक्टर), कडगाव, तांबाळे,शेळोली. हातकणंगले: चोकाक (हेर्ले ८ मेगावॅट- १६ हेक्टर), हातकणंगले, कुंभोज, हुपरी, किणी वाठार, सावर्डे. शिरोळ : कोथळी (कोथळी ४ मेगावॅट ७.२३ हेक्टर), अब्दुललाट, कोंडिग्रे. राधानगरी : सोळांकूर (नरतवडे ५ मेगावॅट- १० हेक्टर).

Solar Agriculture Scheme
Kolhapur Radhanagari Dam : गळती असुनही काळम्मावाडी धरणात जादा तर राधानगरी धरणात कमी पाणीसाठी

चंदगड : चंदगड (काजिर्णे व चुर्णीचा वाडा ४ मेगावॅट- ७.१८ हेक्टर), कोवाड, हलकर्णी (डुक्करवाडी ४ मेगावॅट- १२.४० हेक्टर), हलकर्णी एमआयडीसी, पार्ले, माणगाव, अडकूर. गडहिंग्लज : महागाव (हरळी बुद्रुक ३ मेगावॅट - ५ हेक्टर), गडहिंग्लज एमआयडीसी, हेब्बाळ- क. नुल. आजरा : उत्तुर (मुमेवाडी व उत्तुर ४ मेगावॅट - ८.४३ हेक्टर), नेसरी, गवसे या उपकेंद्रे व गावांचा योजनेत समावेश आहे.

कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता परेश भागवत म्हणाले की, या योजनेमुळे शेतीच्या वीजपुरवठा खर्चात कपात होईल. तसेच अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाचे उद्दिष्टही साध्य होईल. त्यामुळे क्रॉस सबसिडीचा भार कमी होऊन औद्योगिक व व्यवसायिक ग्राहकांच्या वीजदरात कपात होईल. पायाभूत विद्युत सुविधांचे बळकटीकरण, विजेच्या हानीत घट, शेतीला दिवसा व योग्य भाराने वीजपुरवठा, प्रकल्प क्षेत्रातील ग्रामपंचायतींना अनुदान प्राप्त होणार असल्याने जनसुविधांची कामे होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com