River Fishing Contract : शाहू महाराजांनी सुरू केलेली मासेमार ठेकेदारी बंद, मच्छीमारांवर उपासमारीची वेळ

Panchaganga River : महाराष्ट्रात कोल्हापूर एकमेव जिल्हा आहे जेथे पंचगंगा नदीत मासेमारी करण्याचे ठेके मत्स्य विभागाच्या माध्यमातून दिले जातात.
River Fishing Contract
River Fishing Contractagrowon

Kolhapur Fishing : कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराजांपासून नदीतील मासेमारी करण्यासाठी ठेकेदारी पद्धतीवर मच्छीमार करण्याची परवानगी दिली जायची. परंतु शासनाच्या एका अहवालानुसार मच्छीमारांमुळे नदी प्रदुषीत होत असल्याने मासेमारीची ठेकेदारी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यासाठी मच्छीमार संघटनेने विभागीय आयुक्तांना पत्र देत पुन्हा ठेकेदारी सुरू करण्याची मागणी केली.

निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, मासेमारीमुळे नदी प्रदूषित होते, असे म्हणणे चुकीचे आहे. जे मच्छिमार अनैसर्गिक आणि बेकायदा मासेमारी करतात त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी. सरसकट मासेमारीचे ठेके बंद करणे योग्य नाही. मासेमारीचे ठेके पूर्ववत सुरू ठेवावेत; अशी मागणी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीचे महासचिव प्रा. एकनाथ काटकर यांनी केली. मागणीचे निवेदन त्यांनी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिले.

तसेच 'महाराष्ट्रात कोल्हापूर एकमेव जिल्हा आहे जेथे पंचगंगा नदीत मासेमारी करण्याचे ठेके मत्स्य विभागाच्या माध्यमातून दिले जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात राजर्षी शाहू महाराजांनी ठेके देण्याची पद्धत सुरू केली. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी मासेमारीचे ठेके देण्याची पद्धत सुरू ठेवली. पारंपरिक पद्धतीने मासेमारी केल्यामुळे कोणतेही नदीप्रदूषण होत नाही.

River Fishing Contract
Kolhapur Shetkari Sangh : शेतकरी संघाच्या लाल मिरचीवरून राजकारण झालं तिखट, संचालकाचा कारनामा चर्चेत

मात्र मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त यांनी चुकीचा अहवाल दिल्यामुळे असा समज निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीची लांबी ९०५ किलोमीटर आहे. नदीकाठाच्या गावांतील दहा हजार कुटुंबे मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहेत. काहीजण अनैसर्गिक आणि बेकायदा मासेमारी करतात.

यामध्ये ब्लिचिंग पावडर नदीत टाकणे, विजेचा प्रवाह पाण्यात सोडणे, स्फोट करणे असे प्रकार केले जातात. त्यातून नदी प्रदूषित होऊ शकते. असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे. त्यासाठी सरसकट मासेमारी बंद करणे योग्य नाही. पंचगंगा नदीत मासेमारीचे ठेके पूर्ववत सुरू करावेत.' समितीचे चेअरमन अंबाजी पाटील, संचालक अशोक बागडी, सलील सासने यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com