Agriculture Crop Loan : पीककर्ज वाटपात बँकांचा हात आखडताच

Loan Update : खानदेशात पीककर्ज वितरणात काही बँका हात आखडता घेत आहेत. खरीप हंगाम सुरू होऊन अनेक दिवस होत आले, परंतु पीककर्ज वितरण ७० टक्केही झालेले नाही.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात पीककर्ज वितरणात काही बँका हात आखडता घेत आहेत. खरीप हंगाम सुरू होऊन अनेक दिवस होत आले, परंतु पीककर्ज वितरण ७० टक्केही झालेले नाही. खानदेशात सुमारे चार हजार कोटी रुपये पीककर्ज खरिपात वितरित करायचे आहे. एवढे पीककर्ज वितरण होईल केव्हा, असा प्रश्‍न आहे.

राष्ट्रीयीकृत बँका पीककर्ज वाटपात हात आखडता घेत आहेत. शेतकरी नव्या पीककर्जाचे प्रस्ताव घेऊन बँकेत जात आहेत. परंतु बँका शेतकऱ्यांना शाखेत प्रवेश देत नाहीत. अनेक शाखांमध्ये कर्मचारी संख्या कमी आहे. शाखाधिकारी, व्यवस्थापक नसतात, यामुळे पीककर्ज प्रस्तावावर निर्णय होत नाही, असा आरोप शेतकरी करीत आहेत.

Crop Loan
Crop Loan Policy : केंद्राच्या धोरणाला हरताळ फासता का?

जळगाव जिल्ह्यात सुमारे २८०० कोटी, धुळ्यात ५०० आणि नंदुरबारात ६०० कोटी रुपये पीककर्ज वितरण करायचे आहे. गेल्या वर्षीदेखील पीककर्ज फक्त ७५ टक्केच वितरित झाले होते. शासन किंवा प्रशासन पीककर्ज वितरण लक्ष्यांक निश्‍चित करते, परंतु बँकांना पीककर्ज निधीची व्यवस्था करावी लागते, असे काही बँक अधिकारी शेतकऱ्यांना सांगतात, अशाही तक्रारी आहेत.

जळगाव व धुळे जिल्ह्यांत जिल्हा बँकांनी पीककर्ज वितरणात चांगली कामगिरी केली आहे. जळगाव जिल्हा बँक एक लाख शेतकऱ्यांना सुमारे एक हजार कोटी रुपये पीककर्ज देणार आहे. तर धुळे - नंदुरबार जिल्हा बँकेने उद्दिष्टापेक्षा अधिक पीककर्ज वितरण केले असून, हे कर्ज वितरण २६० कोटी रुपयांवर आहे.

Crop Loan
Crop loan : 'सीबील'ची सक्ती करणाऱ्या बँकांविरुद्ध एफआयआर दाखल करणार; फडणवीसांचा बँकांना इशारा 

जळगाव जिल्ह्यात सुमारे १६०० कोटी रुपये पीककर्ज वितरण झाले आहे. धुळे व नंदुरबारातही प्रत्येकी ३५० कोटींवर पीककर्ज वितरण झाले आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीककर्ज वाटपात सुरुवातीपासून पुढे आहे. धुळे व जळगावात जिल्हा बँका सोसायट्यांच्या मदतीने किंवा माध्यमातून बँक शेतकऱ्यांना पीककर्ज देत असून, कर्जवितरण यंदा वेळेत सुरू झाले.

जळगाव जिल्ह्यात फक्त अनिष्ट तफावतीतील सहकारी सोसायट्यांतर्फे पीककर्ज वितरण जिल्हा बँकेने केलेले नाही. या सोसायट्यांमधील सभासद शेतकऱ्यांना थेट पीककर्ज वितरण जिल्हा बँक करीत आहे. ही प्रक्रिया क्लिष्ट व वेळखाऊ असल्याने काही भागात शेतकरी नाराज आहेत. पीककर्जाचे अनेक नवे प्रस्ताव राष्ट्रीयीकृत बँकांत पडून आहेत.

...असे करायचे कर्जाचे वितरण

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांना मिळून सुमारे १८०० कोटी रुपये पीककर्ज वितरण करायचे आहे. धुळे व नंदुरबारातही राष्ट्रीयीकृत बँकांना सुमारे ७०० कोटी रुपये पीककर्ज वितरण करायचे आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बँकांत पीककर्ज वितरण संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी यंदा सुरुवातीपासून कायम आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com