Agriculture Sowing : परभणीत २५.५९ टक्के, तर हिंगोलीत ३२.३० टक्के पेरणी

Sowing Update : परभणी जिल्ह्यात ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी १ लाख ३६ हजार ८८८ हेक्टरवर (२५.५९ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५४ पैकी १ लाख १६ हजार ६३१ हेक्टरवर (३२.३० टक्के) पेरणी झाली आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२४-२५) खरीप हंगामात शुक्रवार (ता. २१)पर्यंत परभणी जिल्ह्यात ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी १ लाख ३६ हजार ८८८ हेक्टरवर (२५.५९ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५४ पैकी १ लाख १६ हजार ६३१ हेक्टरवर (३२.३० टक्के) पेरणी झाली आहे. कमी पावसामुळे या दोन जिल्ह्यांतील अनेक मंडलांतील पेरणी लांबणीवर पडली आहे.

यंदा जून महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात परभणी जिल्ह्यात झालेल्या पावसानंतर पेरणी झाली. परंतु त्यानंतर आठवडाभराचा खंड पडला. तसेच अद्याप या दोन जिल्ह्यांतील ३७ मंडलांमध्ये पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे पेरणी खोळंबली आहे. शुक्रवार (ता. २१)अखेर परभणी जिल्ह्यात सोयाबीनची २ लाख ४९ हजार ७२७ पैकी ४९ हजार ४४२ हेक्टरवर (१९.८० टक्के) पेरणी झाली. कपाशीची १ लाख ९२ हजार २१३ पैकी ८१ हजार ३४७ (४२.३० टक्के) झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : बारामतीच्या जिरायती भागात खरीप पेरणीच्या कामांना वेग

तुरीची ४५ हजार ९५९ पैकी ४ हजार ३५ हेक्टर (१६.४२ टक्के), मुगाची २७ हजार १७८ पैकी १ हजार ९० हेक्टर (४.०१ टक्के), उडदाची ९ हजार ८० पैकी ३०१ हेक्टरवर (३.३१ टक्के) पेरणी झाली. एकूण कडधान्याची ८२ हजार ३७५ पैकी ५ हजार ४६० हेक्टरवर (६.६३ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची ७ हजार ३३३ पैकी ३७२ हेक्टर (५.१ टक्के), बाजरीची १ हजार १६७ पैकी ६७ हेक्टर (५.७४ टक्के), मक्याची १ हजार ३ पैकी १३९ हेक्टर (१३.८५ टक्के) पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Agriculture Sowing : परभणी, हिंगोलीत पेरण्या खोळंबल्या

हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनची २ लाख ५६ हजार ४०४ पैकी ८७ हजार ७०६ हेक्टरवर (३४.२१ टक्के) पेरणी झाली. कपाशीची ३८ हजार ८२१ पैकी १३ हजार ६३२ हेक्टरवर (३५.१२ टक्के) लागवड झाली. तुरीची ४५ हजार ३०६ पैकी ११ हजार १४२ हेक्टर, मुगाची ७ हजार ७८१ पैकी १ हजार ९६७ हेक्टर (२५.२८ टक्के), उडदाची ५ हजार ८७९ पैकी १ हजार २४४ हेक्टर (२१.१६ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची ५ हजार ५०५ पैकी ८७१ हेक्टर (१५.८२ टक्के), मक्याची १ हजार २१८ पैकी ६९ हेक्टर पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) शुक्रवार (ता. २१)पर्यंत

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ९७००० ४४३० ४.५७

जिंतूर ९७८८४ ४१४०० ४२.२९

सेलू ६०५३२ १३१७३ २१.७६

मानवत ४२५९९ २८२८२ ६६.३९

पाथरी ४४९५० १११०३ २४.७०

सोनपेठ ३५०३२ १७४२९ ४९.७५

गंगाखेड ५७८०७ १५२४६ २६.३७

पालम ४५६१६ ५६३० ५१.६०

पूर्णा ५३४७६ १९५ ०.३६

हिंगोली ७७१४४ २६३१५ ३४.११

कळमनुरी ६९१२१ ३०७२२ ४४.४५

वसमत ६३८७२ ३४०२ ५.३३

औंढानागनाथ ६५०१३ ३४७०० ५३.३७

सेनगाव ८५९०२ २१४९२ २५.०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com