Land Health Yavatmal : जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे

Management Cotton and Soybean Crops : आर. एम. फॉस्फेट अँड केमिकल प्रा.लि. यांचा वतीने यवतमाळ येथे नुकतेच ‘कपाशी व सोयाबीन पिकांचे व्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्र पार पडले.
Land Health Yavatmal
Land Health YavatmalAgrowon
Published on
Updated on

Yavatmal Farmers : शेती आपले भरणपोषण करते. तिच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. माती परीक्षण करूनच पिके घ्यायला हवी. जमिनीला आवश्यक अन्नद्रव्यच खतांच्या स्वरूपात द्यायला हवे. शेती करताना शास्त्र समजून घेतले पाहिजे. अलीकडे निसर्ग हातचा राहिला नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत परंपरागत चांगल्या गोष्टींचाही अवलंब करणे गरजेचे असल्याचे मत येथील विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख डॉ. सुरेश नेमाडे यांनी व्यक्त केले. ते यवतमाळ येथे आयोजित शेतकरी व विक्रेता संमेलन संवाद कार्यक्रमात बोलत होते.

आर. एम. फॉस्फेट अँड केमिकल प्रा.लि. यांचा वतीने यवतमाळ येथे नुकतेच ‘कपाशी व सोयाबीन पिकांचे व्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी उपाध्यक्ष मुकुंद धजेकर, वरिष्ठ अग्रोनोमिस्त प्रमोदकुमार पाण्डेय उपस्थित होते.व्ही.सी.एम.एफ.चे जिल्हा व्यवस्थापक विक्रम देशमुख, म.ए.आय.डी.सीचे जिल्हा व्यवस्थापक मनोज गावंडे, आर. एम. फॉस्फेट अँड केमिकल प्रा.लि. विदर्भ विभाग व्यवस्थापक हर्षवंत श्रीवास्तव, क्षेत्र विपणन व्यवस्थापक सिद्धार्थ इंगळे, जिल्हा विपणन व्यवस्थापक भूषण लिखार आदींनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ अग्रोनोमिस्त पाण्डेय, डॉ. नेमाडे आणि जयकांत ॲग्रो एजन्सीचे संचालक जायकांत कोंडावार आदींची उपस्थिती होती.

Land Health Yavatmal
Yavatmal Water Crisis : आठ दिवसांत वाढले ४७ विहिरींचे अधिग्रहण

डॉ. नेमाडे म्हणाले, की निसर्ग आपल्या हातात राहिला नाही. निसर्गचक्र पूर्णतः दिवसेंदिवस जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. नागरी वस्त्यांमुळे जमिनीचे क्षेत्र घटत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढवावे लागणार आहे. त्यासाठी जमिनीत संतुलित खतांचा वापर करावा लागणार आहे. शेतीतील खर्च कमी करून उत्पन्न वाढवावे लागणार आहे. परंपरागत बियाणे वापरायला हवे. शेणखत, कंपोस्ट खत, गांडुळ खत, ग्रीन खतांचा वापर करणे आवश्यक आहे.

या प्रसंगी वरिष्ठ अग्रॉनोमिस्ट पाण्डेय म्हणाले, की कापूस पांढरे सोने नसून ते भावनिक पीक आहे. त्यामुळे ते आपण सोडू शकत नाही. कपाशी, तूर व सोयाबीन या पिकांचे उत्तमरीतीने एकात्मिक अन्नद्रव व्यवस्थापन केल्यास जमिनीचा पोत सुधारून तिला पूर्वीसारखी बनवता येते त्यासाठी महाविराचे फॉर्टिफाइड सिंगल सुपर फॉस्फेट झिरोन आणि झिरोन पॉवर प्लस वापरून जमिनीची उत्पादकता आणि जमिनीची पोच सुधारण्यास मदत मिळते. कार्यक्रमाचे संचालन यवतमाळ जिल्हा विपणन व्यवस्थापक भूषण लिखार यांनी केले. या प्रसंगी क्षेत्र विपणन व्यवस्थापक सिद्धार्थ इंगळे यांनी पाहुण्यांचे आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com