Pune Water Stock: पुणे जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये ४२ टक्के पाणीसाठा जमा

Water Storage Update: जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी-अधिक आहे. डोंगरमाथ्यावर तुरळक पावसाचा अपवाद वगळता पावसाने पाठ फिरवली आहे.
Pune Dams
Pune DamsAgrowon
Published on
Updated on

Pune News: जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी-अधिक आहे. डोंगरमाथ्यावर तुरळक पावसाचा अपवाद वगळता पावसाने पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील २६ धरणसाखळीत ४२.२२ टीएमसी म्हणजेच २१.२८ टक्के पाणीसाठा झाला आहे.

गुरुवारी (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यंत निमगिरी येथे २५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर माळीण २२, लोणावळा, हडपसर १७.५, एनडीए १६.५ शिवाजीनगर १६.५, पाषाण १६.५, भोर १३, मगरपट्टा १२, चिंचवड ८, गिरीवण ७.५, राजगुरुनगर ७ मिलिमीटर पाऊस पडला. तर, हवेली, कोरेगाव पार्क, पुरंदर, तळेगाव ढमढेरे, दापोडी या भागांत हलक्या सरी बरसल्या.

Pune Dams
Water Resources : धुळे जिल्ह्यात दोन हजारांवर जलस्रोतांची तपासणी

गत वर्षीच्या तुलनेत सध्या धरणसाखळीत अधिक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सर्वच धरणसाखळीत १६.४६ टीएमसी म्हणजे ८ टक्के पाणीसाठा होता. यंदा मे अखेरपर्यत साधारणपणे २० टीएमसी, तर एक ते ४ जून या कालावधीत ४.३४ टीएमसी एवढा पाणीसाठा नव्याने आला आहे.

Pune Dams
Khadakwasla Dam : खडकवासला धरणसाखळीत पाच वर्षांत नीचांकी पाणीसाठा

नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणातील पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली आहे. कुकडी खोऱ्यातील डिंभे, घोड धरणांत बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. तर पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, येडगाव, चिल्हेवाडी या धरणांतील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही.

तर, उजनी धरणातील पाणीसाठ्यात पावसामुळे मोठी वाढ झाली आहे. ४५ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्यात प्लसमध्ये आले. सध्या या धरणात पाणीसाठा १५.४० टीएमसी म्हणजेच २८ टक्के झाला आहे.

खडकवासला धरणात ३७.६७ टक्के पाणीसाठा

यंदा मे महिन्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरणसाठ्यात बऱ्यापैकी भर पडली. त्याचा थोडाफार फायदा पुणे शहर व परिसराला आणि ग्रामीण भागाला होत आहे. सध्या मुठा खोऱ्यातील पानशेत व वरसगाव धरणातून खडकवासला धरणात सध्या पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. पानशेत धरणामध्ये सध्या १७.५७ टक्के, वरसगावमध्ये २१.५६ टक्के, टेमघरमध्ये ४.८० टक्के आणि खडकवासला धरणात ३७.६७ टक्के पाणीसाठा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com