Parbhani Water Stock : लघु तलावात १० टक्के, तर मध्यम प्रकल्पांत १४ टक्के पाणीसाठा

Water Storage : पाणलोटात झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसामुळे परभणी जिल्ह्यातील कोरड्या पडलेल्या ७ लघु तलावात पाणी जमा झाले आहे.
Water Storage
Water Storage Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : पाणलोटात झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसामुळे परभणी जिल्ह्यातील कोरड्या पडलेल्या ७ लघु तलावात पाणी जमा झाले आहे. गुरुवारी (ता. २९) घेतलेल्या नोंदीनुसार लघु प्रकल्पांमध्ये सरासरी १० टक्के तर मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी १४ टक्के पाणीसाठा होता.

जायकवाडी पाटबंधारे विभाग अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील २१ व जालना जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्पांची पूर्ण जल क्षमता सरासरी ४५.८२७ दलघमी तर उपयुक्त पाणीसाठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे. गुरुवारी (ता. २२) घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील लघु तलावामध्ये सरासरी ३.९१५ दलघमी तर पाणी साठा होता.

Water Storage
Marathwada Water Crisis : मराठवाड्यातील ३७० गावे, १४९ वाड्यांना टंचाईच्या झळा

पावसामुळे त्यात वाढ झाली. गुरुवारी (ता. २९) घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ४.१६४ दलघमीनुसार १० टक्के होता. दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ७.२५८ दलघमीनुसार १० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

उपसा तसेच तापमानातील वाढ, बाष्पीभवनामुळे जिंतूर तालुक्यातील जोगवाडा, बेलखेडा, चारठाणा, चिंचोली, आडगाव, केहाळ, देवगाव हे ७ लघु तलाव कोरडे पडले होते. या तलावांच्या पाणलोटात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे पाणी जमा झाले आहे.

त्यामुळे आता पेडगाव (ता. परभणी), आंबेगाव (ता. मानवत), नखातवाडी (ता. सोनपेठ), टाकळगाव, कोद्री (ता. गंगाखेड), भोसी, दहेगाव, कवड, मांडवी (सर्व ता. जिंतूर) या लघू तलावासह जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या जिल्ह्यातील लघु तलावांची संख्या १६ झाली आहे. वडाळी (ता. जिंतूर) येथील लघु तलावात १० टक्के, पाडाळी (जि. जालना) येथील लघु तलावामध्ये ११ टक्के पाणीसाठा होता.

Water Storage
Water Crisis : पावसाने सोडविला पाणीप्रश्‍न

झरी (ता. पाथरी) येथील लघु तलावामध्ये १०० टक्के, तांदुळवाडी (ता. पालम) येथील लघु तलावात १ टक्का, राणीसावरगाव (ता. गंगाखेड) येथील लघु तलावात ८ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) येथील लघु तलावामध्ये ३८ टक्के पाणीसाठा होता.२०२४ च्या २९ मे रोजी लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ०.९४८ दलघमी (२ टक्के) पाणीसाठा होता. त्यावेळी १२ लघु तलाव कोरडे पडले होते तर ७ लघु प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली होता.

दोन मध्यम प्रकल्पात १४ टक्के पाणीसाठा...

मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. करपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता २८.८२० दलमघी असून त्यापैकी उपयुक्त साठा क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता ३४.०८५ दलघमी असून त्यापैकी उपयुक्त साठा २७.१४१ दलघमी आहे.

जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे गुरुवारी (ता. २९) घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार करपरा प्रकल्पात २.३७४ दलघमी नुसार ९ टक्के तर मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये ४.९३२ दलघमी नुसार १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. दोन्ही मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ७.२५८ दलघमीनुसार १४ टक्के पाणीसाठा होता.२०२४ च्या २९ रोजी करपरा मध्यम प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा नव्हता. मासोळी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com