Rabi Sowing : रब्बी ज्वारी, हरभऱ्याची १५ लाख हेक्टरवर पेरा

Rabi Jowar Sowing : रब्बी ज्वारी व हरभऱ्याची सर्व साधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन पेरणी झाली आहे.
Jowar
JowarAgrowon

Latur News : विभागातील पाच जिल्ह्यांत रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी १५ लाख ६६ हजार ६८३.२१ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या ११४.८७ टक्क्यांवर झाली आहे. रब्बी ज्वारी व हरभऱ्याची सर्व साधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन पेरणी झाली आहे.

खरीपापाठोपाठ रब्बीवरही संकटाचे ढग कायम आहेत. यंदा शेतकऱ्यांनी हरभऱ्या बरोबरच रब्बी ज्वारीलाही पसंती दिली आहे. ज्वारीचे वाढलेले दर त्यासाठी मुख्य कारण ठरले असून मध्यंतरी झालेल्या पावसानंतर ज्वारी पेऱ्यांत मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी रब्बी ज्वारीवर पुरेशा ओलाव्याअभावी संकटाचे ढग दाटले आहेत. हरभऱ्यातही घाटे अळी व मरचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

Jowar
Rabi Sowing : पुणे विभागात एक लाख ६३ हेक्टर क्षेत्र रब्बी पेरणीपासून दूर

पाच जिल्ह्यांतील पीकनिहाय क्षेत्र व स्थिती

रब्बी ज्वारीवर लष्करी अळी

रब्बी ज्वारी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर असून आत्तापर्यंत ३ लाख ८३ हजार ७७८.५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी १०३.२१ टक्के आहे. पिक सध्या कणसामध्ये दाणे भरण्‍याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

Jowar
Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा

गव्हाचे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत

गहू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर असून आत्तापर्यंत १७ हजार १५८.५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ९५.४८ टक्के आहे. पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.

करडईवर माव्याचा प्रादुर्भाव

करडई पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर असुन आत्तापर्यंत ३३ हजार ७७९.९८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून त्याची टक्केवारी १७२.९६ टक्के आहे. पीक सध्या बोंड्यामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. पिकावर अल्प प्रमाणात मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

हरभऱ्यावर घाटे अळी व मर

हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर असुन आत्तापर्यंत ९ लाख ९८ हजार ३५८.१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी १२७ टक्के आहे. पिक सध्या घाटे भरण्याच्या व काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत आहे. पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात आढळून येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com