
Rajgurunagar News: यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या वतीने उच्च शिक्षण संचालनालय, कौशल्य विकास विभाग व मंत्रालयाच्या नियोजन विभागातील ३३ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सौरग्राम मौजे टेकवडी (ता. खेड) गावाला भेट देत अभ्यास दौरा पूर्ण केला. त्यावेळी ‘यशदा’चे विनय कुलकर्णी व सूर्यकांत महाडिक उपस्थित होते.
गावात आलेल्या अधिकाऱ्यांचे स्वागत महिलांनी पारंपरिक पद्धतीने केले. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना टेकवडीचे सरपंच विठ्ठल शिंदे यांनी टेकवडीच्या विविध विकास कामांची माहिती देत मार्गदर्शन केले.
यामध्ये शासकीय योजनांसोबत कंपन्यांच्या ‘सीएसआर’ फंडातून गावचा केलेला विकास, त्यातून कष्टकऱ्यांना झालेला लाभ, एकजुटीने केलेले पर्यावरण समतोल राखण्याचे काम तसेच महाराष्ट्रातील दुसरे व पुणे जिल्ह्यातील पहिले सौरग्राम करण्यापर्यंतचा प्रवास, गेल्या २५ वर्षांपासून बिनविरोध होणारी ग्रामपंचायत निवडणूक परंपरा,
गावातील सर्व वयोगटातील ग्रामस्थांचे उत्तम संघटन, एकजूट, सोलरच्या माध्यमातून शून्य वीजबिल आणि २४ तास शुद्ध पाणीपुरवठा, आदर्श शाळा, प्रत्येक घरी बायोगॅस वापर, ५८ सौर पथदिवे, व्यायामशाळा या व इतर सर्व विकास कामांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाव फेरीच्या माध्यमातून घेतली.
अधिकाऱ्यांनी केले कौतुक
गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि गावातील वृद्धांसाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक रिक्षा अधिकाऱ्यांच्या मनाला अधिक भावली. गावाच्या माळरानावर ४००० औषधी वृक्षांची केलेली लागवड व त्यांच्या संवर्धनाचे सर्व अधिकाऱ्यांनी तोंड भरून कौतुक केले. विविध उत्पन्नाचे मार्ग याबाबत अधिकाऱ्यांनी टेकवडी ग्रामस्थांना सखोल मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार टेकवडी ग्रामस्थ व महिलांनी मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.