
Amravati News : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील पहिले ‘सौरग्राम’ होण्याचा बहुमान चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी गावाला मिळाला. छतावर सौरप्रकल्प बसवून वीजनिर्मितीला सुरवात केल्यामुळे पुढील काळातील गावाचे विजेचे बिल शून्य होणार असल्याचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी सांगितले.
स्वतंत्र गावाचा दर्जा असलेले संत श्री गाडगे महाराज संस्थान व आश्रमशाळा नागरवाडी गावातील सर्व वीजजोडण्या सौरप्रकल्पाला जोडल्यामुळे नागरवाडी हे पहिले सौरग्राम ठरले आहे. यावेळी या संस्थानचे संस्थापक बापूसाहेब देशमुख, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट, उपकार्यकारी अभियंता दिनेश भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.
चांदूरबाजारपासून २० किमी अंतरावर असणारे संत श्री गाडगे महाराज संस्थान, नागरवाडी या गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा आहे. आश्रम शाळा, वसतिगृह आणि एकूण १० शिक्षक सदनिकांचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेतील प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदानाचा लाभ घेत याठिकाणी १० शिक्षक सदनिकेच्या छतावर प्रति एक किलोवॅटचे सौर प्रकल्प बसविण्यात आले.
त्याचबरोबर संस्थेसाठी ७.५ किलोवॉटचे स्वतंत्र सौर प्रकल्प (विना अनुदान) बसविण्यात आले आहे. त्यामुळे एकूण १७.५ किलोवॉटची सौरयंत्रणा बसविण्यात आल्यामुळे महिन्याला सरासरी दोन हजार युनिटची वीजनिर्मिती होणार आहे व वीज देयकात तेवढीच बचत होणार आहे.
नागरवाडीला सौरग्रामचा बहुमान मिळवून देण्यासाठी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी आणि अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट, उपकार्यकारी अभियंता दिनेश भागवत, सहायक अभियंते प्रसाद पांडे आणि चंद्रशेखर कुंभारकर यांनी मोलाची भूमिका पार पाडली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.