Team Agrowon
डाळिंबाची उत्पादनात घट असूनही डाळिंबाची निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा साधल्या. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत जगभरातील ४५ ते ५० देशांतील बाजारपेठेत डाळिंबाची निर्यात झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पुन्हा डाळिंब निर्यातीत वाढ होऊ लागली असल्याचे चित्र आहे. सन २०२३-२४ या वर्षात डाळिंबाची ७२ हजार ११ टन निर्यात झाली असून, सन २०२२- २३ च्या तुलनेत ९ हजार ७३२ टनांनी निर्यात वाढली आहे.
युरोपसह अरब अमिराती, बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि थायलंड यांसह सुमारे ४५ देशात डाळिंबाची निर्यात होत आहे.
२०२१-२२ मध्ये भारतातून ९९ हजार ०४३ टन डाळिंबाची निर्यात झाली होती. २०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये ३१ हजार टनाने निर्यातीत वाढ झाली होती. त्यामुळे देशातून डाळिंबाची निर्यात वाढीचा आलेख वाढत चालला होता.
गेल्या तीन वर्षांपूर्वी देशभरातील डाळिंबावर पिनहोल बोरर, शॉट होल बोरर या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यातच नैसर्गिक संकटामुळे तेलकट, मर सारख्या रोगाचाही फटका डाळिंबाला बसला होता.
पिनहोल बोरर, शॉट होल बोरर या रोगामुळे डाळिंबाच्या बागा काढण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्याय नव्हता. यासाऱ्या परिणाम निर्यातीवर झाला.
गेल्या वर्षभरापासून या देशातील बाजारपेठांमधून पुन्हा डाळिंबाची मागणी हळू हळू वाढू लागली आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही देशातून डाळिंबाची निर्यात करण्यासाठी शेतकरी रेसिड्यु फ्री डाळिंबाचे उत्पादन घेण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत.
Stubble Burning : शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष जाळाल तर दंड भराल