Pomegranate Farming : यंदा दोन्ही बहरांचे नियोजन करतोय!

Pomegranate Cultivation : खंडाळी (ता. मोहोळ) येथे विजय माळी यांच्याकडे ८ एकरांवर डाळिंबाच्या भगवा वाणाची लागवड आहे.
Pomegranate Farming
Pomegranate FarmingAgrowon
Published on
Updated on

Pomegranate Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : डाळिंब

शेतकरी : विजय माळी

गाव : खंडाळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर

डाळिंब क्षेत्र : ८ एकर

खंडाळी (ता. मोहोळ) येथे विजय माळी यांच्याकडे ८ एकरांवर डाळिंबाच्या भगवा वाणाची लागवड आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते डाळिंब शेती करत आहेत. डाळिंबाची १२ फूट बाय ८ फुटांवर लागवड आहे. एकूण आठ एकरांपैकी तीन एकर क्षेत्रावर मृग बहर, तर ५ एकरांवर आंबिया बहर धरण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्याची तयारी आता सुरू आहे.

सध्या मृग बहरातील डाळिंब प्लॉटची काढणी पंधरवड्यात सुरू होईले. दरवर्षी सरासरी १२ ते १३ टन उत्पादन घेतात. यंदा पाऊसमान आणि वातावरणामुळे थोडा परिणाम झाला आहे. तरीही या वर्षी एकरी सरासरी १० टन उत्पादन मिळू शकेल, असा त्यांचा अंदाज आहे. वडिलांसह भाऊ समाधानची शेती व्यवस्थापनात मजत मिळते. जमिनीची सुपीकता राखण्यासाठी बागेत रासायनिक आणि सेंद्रिय घटकांचे संतुलन राखले जाते.

Pomegranate Farming
Pomegranate Export : डाळिंब निर्यात सुसाट ; ४५ देशात पोहोचला भारतीय डाळिंबाची गोडवा

व्यवस्थापनातील बाबी

दरवर्षी डाळिंबाचा मृग बहर धरतो, पण पावसाच्या गणितावरच पुढे अंबिया बहरही धरण्याचे नियोजन केले जाते. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे पाणी शेवटपर्यंत पुरण्याची आशा आहे. म्हणूनच या वेळी मृग आणि पुढे आंबिया बहर धरणार आहे. मृग बहराचे डाळिंब डिसेंबर-जानेवारीमध्ये बाजारात येते, तर अंबिया बहराचे डाळिंब जून-जुलैमध्ये विक्रीसाठी येते. या दोन्ही कालावधीत दर्जेदार उत्पादनाला दरही चांगला मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

आंबिया बहर नियोजन

ऑक्टोबर महिन्यापासून आंबिया बहराची पूर्वतयारी सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये हलकी पूर्वछाटणी करून घेतली.

त्या आधी पंधरा दिवस सप्टेंबर अखेरीलाच सल्फेट ऑफ पोटॅश (०ः०ः५०) या विद्राव्य खताची फवारणी केली. त्यामुळे झाडांमध्ये अन्न साठवण्याची उत्तम क्षमता तयार होते.

मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कीडनाशकांची खोडावर फवारणी केली.

Pomegranate Farming
Pomegranate Rate : हंगामाच्या प्रारंभीच डाळिंबाचे दर दबावात

संपूर्ण बागेची स्वच्छता करून घेतली.

त्यानंतर एकरी ६ ट्रेलर शेणखत टाकले. रासायनिक खतांचा बेसल डोस दिला.

बागेमध्ये बोर्डो मिश्रण (एक टक्के) फवारणी करून घेतली.

चार दिवसांतून एकदा या प्रमाणे सिंचन केले.

मागील महिन्यात बागेला आठवड्यातून एकदा या प्रमाणे आलटून-पालटन ०ः५२ः३४ आणि ०ः०ः५० या खतांच्या मात्रा ठिबकद्वारे सोडल्या आहेत.

पुढे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बहर छाटणी घेण्याचे नियोजन आहे.

सध्या बाग ताणावर सोडली असल्याने खते आणि पाणी पूर्णपणे बंद केले आहे.

पुढील वीस दिवसांतील नियोजन

बागेमध्ये फणपाळी घेऊन बागेतील झाडांच्या खोडांना माती लावून घेणार आहे.

कीड रोगाच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार फवारणी घ्यावी लागेल.

-विजय माळी, ९९२१०३७४२४

(शब्दांकन : सुदर्शन सुतार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com