Sustainable Agriculture : शाश्‍वत शेतीसाठी केव्हीकेमार्फत कृषी हवामान व निसर्ग शेतीचा जागर

Agriculture and Climate Awareness Programme : देशातील ५०० आकांक्षीत तालुक्यांमध्ये शाश्‍वत ग्रामीण शेती जीवनमान उंचावण्याच्या यादृष्टीने शेती व हवामान जागरूकता कार्यक्रम राबवला जात आहे. वाशीम केव्हीकेच्या पुढाकाराने यासाठी कार्य हातात घेण्यात आले आहे.
Agriculture Programme
Agriculture ProgrammeAgrowon
Published on
Updated on

Washim News : देशातील ५०० आकांक्षीत तालुक्यांमध्ये शाश्‍वत ग्रामीण शेती जीवनमान उंचावण्याच्या यादृष्टीने शेती व हवामान जागरूकता कार्यक्रम राबवला जात आहे. वाशीम केव्हीकेच्या पुढाकाराने यासाठी कार्य हातात घेण्यात आले आहे.

कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषी हवामान केंद्र प्रकल्पांतर्गत भारतीय मौसम विज्ञान विभाग पृथ्वी मंत्रालय भारत सरकारच्या सौजन्याने जिल्ह्यातील आकांक्षित तालुका मालेगावमधील मेडशी येथे कृषी हवामान जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला.

Agriculture Programme
Sustainable Agriculture : शाश्वत शेतीतील संशोधनासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची गरज

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे होते. जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मीताई प्रदीप तायडे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मीबाई रामभाऊ साठे, संचालिका महिला शेतकरी गट प्रियाताई पाठक यासमवेत मार्गदर्शक म्हणून पीक शास्त्रज्ञ तथा कृषी हवामान प्रकल्पाचे नोडल अधिकारी तुषार देशमुख, पशुविज्ञान तज्ज्ञ मयूर देशमुख, कृषी सहाय्यक डी. के. रणवीर, वल्लभ पाठक, विलास जाधव यांची उपस्थिती होती.

Agriculture Programme
Sustainable Agriculture Award : कॅन बायोसिसला ‘फिक्की’चा ‘सस्टेनेबल ॲग्रिकल्चर’ पुरस्कार

कार्यक्रमाच्या तांत्रिक चर्चासत्रात तुषार देशमुख यांनी शेतकऱ्यांना कृषी हवामान शेतीसमस्या व पीक व्यवस्थापन जागृतीसाठी कृषी हवामान माहितीचे मोबाइल तंत्रज्ञान आधारित मेघदूत, दामिनी ॲप व कृषी हवामान पत्रिकेचा वापर करावा याची माहिती दिली.

तसेच आधुनिक कृषी संशोधनातून निर्मित नवीन वाण सुधारीत पीकवाण भीमातूर, गहू १०४- ९, शरबती गहू एमएसीएस ६४७८ , भुईमूग एकेजी ०७३ , करडी आयएसएफ ७६४ व अनुकुल शेतीतंत्र पद्धती वापर याबद्दल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कृषी हवामान निरीक्षक एस. एम. बोदडे यांनी केले. उपस्थितांचे आभार अजिंक्य मेडशीकर यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com