Sugarcane FRP : हंगाम संपला; तरी थकीत उसबिलांची प्रतीक्षा

Sugarcane Season : परिणामी शेतकऱ्यांना उसबिलांची प्रतीक्षा करावी लागत आहे. १५ एप्रिलअखेर जिल्ह्यातील २४ कारखान्यांकडे ४०५ कोटी रुपयांची उसबिले थकली आहेत.
Sugar Factory FRP
Sugar Factory FRPAgrowon

Solapur News : सिद्धेश्वर साखर कारखाना वगळता सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा यावर्षीचा गळीत हंगाम संपला आहे. काही कारखाने बंद होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला, तरी थकीत उसबिलाचा आकडा मात्र कमी होताना दिसत नाही. परिणामी शेतकऱ्यांना उसबिलांची प्रतीक्षा करावी लागत आहे. १५ एप्रिलअखेर जिल्ह्यातील २४ कारखान्यांकडे ४०५ कोटी रुपयांची उसबिले थकली आहेत.

जिल्ह्यात यंदा ३६ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. १७ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात एक कोटी ६६ लाख ६९ हजार २३९ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन एक कोटी ५७ लाख ६० हजार ३२२ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.४५ टक्के आहे.

Sugar Factory FRP
Sugarcane FRP : उसाला बाजारभाव देण्यात विघ्नहर कमी पडणार नाही

जिल्ह्यातील हंगाम जवळपास संपला तरी उसाचे पैसे थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक चिंता वाढली आहे. मार्चअखेर जिल्ह्यातील कारखान्यांकडे ४५१ कोटी एफआरपी थकीत होते. मागील १५ दिवसात त्यापैकी केवळ ४६ कोटी रुपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत. अद्यापही ४०५ कोटी रुपये थकीत आहेत.

Sugar Factory FRP
Sugarcane FRP : देशातील साखर कारखान्‍यांनी दिली ८७ टक्के एफआरपी

कारखान्यांचा साखर उतारा अंतिम होणे गरजेचे

अनेक कारखाने उसाचा रस, ‘बी’हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलनिर्मिती करीत असल्याने गेल्यावर्षीच्या फेब्रुवारीत राज्य शासनाने उसाची एफआरपी देण्यासंदर्भात एक नियमावली तयार केली होती. त्यानुसार उसबिलाचा पहिला हप्ता बेसिक रिकव्हरीप्रमाणे द्यायचा. कारखान्याचा हंगाम संपल्यानंतर १५ दिवसात ‘व्हीएसआय’कडून अंतिम साखर उतारा निश्चित करून एफआरपीची उर्वरित रक्कम देण्याची तरतूद त्यामध्ये आहे.

यंदाच्या हंगामात सुरुवातीला काही महिने कारखान्यांनी उसाचा रस व 'बी'हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल तयार केले. तथापि,केंद्र सरकारने नंतर त्यावर निर्बंध घातले. त्यामुळे या हंगामातील साखर उतारा कारखान्यांनी अंतिम करून घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय एफआरपी निश्चित होणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com