Gram Panchayat Election : ग्राम पंचायत निवडणुकांसाठी १९३ अर्ज दाखल

Palghar Local Body Election : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ५१ ग्रामपंचायतीमधील ६२८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionAgrowon
Published on
Updated on

Palghar News : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ५१ ग्रामपंचायतीमधील ६२८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत ६२८ जागांकरिता १९३ इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर पोटनिवडणुकीच्या ८९ जागांसाठी १५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

पालघर जिल्ह्यात १६ ऑक्टोबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. उद्या (ता. २०) अर्जासाठी शेवटची मुदत आहे. २३ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. वाडा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी १० सदस्यांसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही.

Gram Panchayat Election
Digital Gram Panchayat : ग्रामपंचायतींचा कारभार होणार डिजिटल

तलासरी तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या १२२ सदस्यांसाठी ५३ जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, वसई तालुक्यात तीन ग्रामपंचायतींकरिता ३८ सदस्य निवडून द्यायचे असून २२ जणांनी अर्ज दाखल केले. जव्हारमधील एका ग्रामपंचायतीमध्ये १० सदस्य निवडून द्यायचे असून पाच, तर मोखाडा तालुक्यात चार ग्रामपंचायतीच्या ३८ सदस्य निवडून द्यायचे असून फक्त दोन जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

विक्रमगडमध्ये अल्प प्रतिसाद

वसई तालुक्यात तीन ग्रामपंचायतींकरिता ३८ सदस्य निवडून द्यायचे असून २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. विक्रमगड तालुक्यात दोन ग्रामपंचायतींमधून २० सदस्य निवडून द्यायचे असून एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. वसई तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी तीन सदस्यांसाठी एक; तर विक्रमगडमधील दोन ग्रामपंचायतींच्या दोन सदस्यांसाठी एकही अर्ज दाखल नाही.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : जुन्नरला २६ गावांच्या सरपंच पदासाठी १२६ अर्ज

‘नामनिर्देशन कालावधी वाढवा’

कासा : पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी येत असलेल्या समस्या पाहता नामनिर्देशनासाठी कालावधी वाढवून मिळण्याची मागणी आमदार विनोद निकोले यांनी केली आहे. त्यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. १६ ते २० ऑक्टोबरपर्यंत ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येत आहेत.

डहाणू तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण जास्त आहे. इंटरनेट सुविधा देखील व्यवस्थित चालत नसल्याने उमेदवारी नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात अडचणी येत आहेत. नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा दोन दिवसांनी कालावधी वाढवून द्यावा. याचा फायदा जिल्ह्यातील सर्व इच्छुकांना होईल, असे आमदार निकोले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय अर्ज

तालुका निवडणूक पोटनिवडणूक

पालघर ७४ ८

डहाणू ३६ ०

तलासरी ५३ १

जव्हार ५ २

मोखाडा २ ३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com