Digital Gram Panchayat : ग्रामपंचायतींचा कारभार होणार डिजिटल

Latest Agriculture News : मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते यासंबंधीच्या क्युआरकोडचे वितरण ग्रामपंचायतींना करण्यात आले.
Gram Panchayat Digitalization
Gram Panchayat Digitalization Agrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार डिजिटल होणार असून सर्व ग्रामपंचायतींचे आता एकाच बॅंकेत खाते काढण्यात आले असून, कर संकलनासाठी ग्रामपंचायतींना क्युआर कोड देण्यात आला आहे.

त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार डिजिटल होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते यासंबंधीच्या क्युआरकोडचे वितरण ग्रामपंचायतींना करण्यात आले.

Gram Panchayat Digitalization
Gram Panchayat Election : जुन्नरमध्ये २६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

या कार्यक्रमाला पंचायत राजचे राज्य व्यवस्थापन कक्ष संचालक आनंद भंडारी, उपसंचालक श्याम पटवारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, एचडीएफसी बॅंकेचे माधव मगे, अजिंक्य पुरवत, दयाशंख गायकवाड क्षमता बांधणी तज्ज्ञ अमर ढाले, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी उपस्थित होते. ग्रामनिधी या नावाने खाते काढण्यात आले आहे.

Gram Panchayat Digitalization
Gram Panchayat Fund : ग्रामपंचायतींच्या निधीत तीनपट वाढ

एचडीएफसी या बॅंकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील ५५० ग्रामपंचायतींची खाती काढण्यात आली आहेत. या ग्रामपंचायतींना क्युआर कोड देण्यात आला असून, करांचे संकलन गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद स्तरावर दररोज पाहता येणार आहे. लोकांना एका क्लिकवर कर ग्रामपंचायतींच्या खात्यावर भरणा करता येणार आहे. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.

Gram Panchayat Digitalization
Gram Panchayat Tax : शंभर टक्के कर भरणाऱ्या महिलांचा पैठणी देऊन गौरव

सीईओ मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असून एचडीएफसी बॅंकेचे माधव मगे, अजिंक्य पुरवत, दयाशंख गायकवाड यांनी ग्रामपंचायतींची आनलाइन बॅंकिंग खाती काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. असेही शेळकंदे यांनी सांगितले. २०२३-२४ चे व २०२२-२३ चे प्रलंबित पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती विकास आराखडे ई-ग्राम स्वराज्य पोर्टलवर अपलोड करण्यासाठी तालुका व्यवस्थापक व गट विकास अधिकारी यांचा आढावा संचालक आनंद भंडारी यांनी घेऊन मार्गदर्शन केले.

लोकांना वेळेत दाखले द्या : आव्हाळे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत प्रशिक्षण वेळेत पूर्ण करा, आपले सरकारअंतर्गत सर्व ग्रामपंचायतींनी सर्व प्रकारचे दाखले वेळेत द्यावेत, लोकांना चांगली सेवा द्यावी, आपले सरकारअंतर्गत इतर सुविधाही देण्यात याव्यात, अशा सक्त सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com