Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionAgrowon

Gram Panchayat Election : खेड तालुक्यामधील २५ गावांत ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू

Local Body Election : खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले असून, २१ ग्रामपंचायतींच्या ३२ रिक्त जागांच्या पोटनिवडणुका कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.
Published on

Pune News : खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले असून, २१ ग्रामपंचायतींच्या ३२ रिक्त जागांच्या पोटनिवडणुका कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.

राज्यातील लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगूल वाजल्याने मात्र इच्छुक उमेदवारांची आणि लोकमतातून निवडून येणाऱ्या सरपंच पदाला इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गावामध्ये गुप्त बैठकींना वेग येऊ लागला आहे. तर इच्छुकांनी वार्डनिहाय संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. पॅनेल तयार करण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : परभणी तालुक्यात तीन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक

२१ ग्रामपंचायती ३२ जागांच्या पोटनिवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे (आरक्षण) : मोई (सर्वसाधारण), वडगाव घेनंद (अनुसूचित जाती), नाणेकरवाडी (अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास वर्ग स्त्री), कुरुळी (नागरिकांचा मागास वर्ग स्त्री), केळगाव (नागरिकांचा मागास वर्ग), खरपुडी खुर्द (सर्वसाधारण), जऊळके खुर्द (अनुसूचित जमाती), ढोरे भांबुरवाडी (सर्वसाधारण),

रेटवडी (सर्वसाधारण स्त्री), शेंदुली (अनुसूचित जमाती स्त्री २ जागा), मोहकल (अनुसूचित जमाती स्त्री), धामणगाव खुर्द (अनुसूचित जमाती स्त्री), धामणगाव खुर्द (अनुसूचित जमाती स्त्री), वेताळे (अनुसूचित जमाती), पापळवाडी (सर्वसाधारण स्त्री), पाळू (अनुसूचित जमाती), आंबोली (सर्वसाधारण), सायगाव (अनुसूचित जमाती), शिंदे (अनुसूचित जमाती), शेलू (सर्वसाधारण), अहिरे (नागरिकांचा मागास वर्ग).

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : अठरा ग्रामपंचायतींसाठी थेट जनतेतून सरपंच निवड

या गावांमध्ये रंगणार लढत...

निघोजे, पिंपळगाव तर्फे खेड, वरुडे, गाडकवाडी, सातकरस्थळ, सांडभोरवाडी, कोहिनकरवाडी, होलेवाडी, संतोषनगर, वाकी बुद्रुक, सुपे, आडगाव, वाघु, वहागाव, देशमुखवाडी, कोळीये, तिफनवाडी, वाळद, गोरेगाव, डेहणे, धुवोली, मोरोशी, एकलहरे, भोमाळे, परसुल.

जिल्ह्यात ३२१ ग्रामपंचायतींची निवडणूक

पुणे जिल्ह्यात २३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह १५७ ग्रामपंचायतींच्या २२६ रिक्त जागांच्या पोटनिवडणुका आणि सात रिक्त सरपंचपदाच्या लोकमतातून निवडणुका होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com