Crop Damage Compensation : अठरा हजारांवर शेतकरी विमा भरपाईच्या प्रतीक्षेत

Awaiting Crop insurance compensation : केवळ १७ हजार ३६१ शेतकऱ्यांच्या खात्यावरच भरपाई जमा करण्यात आली असून, तब्बल १८ हजार ४३३ शेतकरी अद्यापही भरपाईपासून वंचित आहेत.
Crop Damage Compensation
Crop Damage CompensationAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : दिग्रस तालुक्‍यात पीकविमा भरपाईचा गुंता कायम आहे. तालुक्‍यात ३७ हजार ३९ शेतकऱ्यांनी विमा भरपाईबाबत पूर्वसूचना दिली. त्यानंतर देखील केवळ १७ हजार ३६१ शेतकऱ्यांच्या खात्यावरच भरपाई जमा करण्यात आली असून, तब्बल १८ हजार ४३३ शेतकरी अद्यापही भरपाईपासून वंचित आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरिपात अनेक संकटांचा सामना करावा लागला. सुरुवातीला पावसाचा खंड, त्यानंतर मुसळधार पाऊस आणि परत खंड अशी स्थिती जिल्ह्यात होती. त्याची दखल घेत प्रशासनाकडून नुकसान सर्वेक्षण, पंचनामे करण्यात आले. मात्र शासनाकडून भरपाईपोटी छदामही जमा करण्यात आला नाही.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : भरपाई न मिळाल्यास रस्त्यावर उतरू

परिणामी विमा भरपाई मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र विमा कंपनीने देखील शेतकऱ्यांची पुरती निराशा केली आहे. यंदाच्या हंगामात एक रुपयात विमा असल्याने शेतकऱ्यांचा याला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मात्र भरपाईपोटी एक ते दोन रुपये खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला.

Crop Damage Compensation
Crop Insurance Compensation : राज्यात यवतमाळच्या शेतकऱ्यांची भरभराट

या कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असतानाच पूर्वसूचना देणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवण्यात आल्याने या असंतोषात आणखी भर पडली आहे. दिग्रस तालुक्‍यात ४२ हजार १०० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. त्यातील ३७ हजार ३९ शेतकऱ्यांनी ७२ तासांत कंपनीला नुकसानीबाबत माहिती दिली.

यातील केवळ १७ हजार ३६१ शेतकऱ्यांच्या खात्यातच विमा रक्‍कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित १२४५ शेतकऱ्यांचे ‘अकाउंट नॉट व्हेरीफाय’ असे सांगत त्यांना क्‍लेम देण्यास विलंब होत आहे. १८ हजार ४३३ शेतकरी विमा भरपाईपासून वंचित आहेत.

शेतकऱ्यांचे किती क्‍लेम मंजूर झाले, किती परतावा दिला व किती शेतकऱ्यांचे दावे प्रलंबित आहेत, याविषयी विमा कंपनीकडे माहिती मागण्यात आली. परंतु त्यांनी ती दिली नाही. त्यामुळे नेमकी आकडेवारी कळण्यात अडचण येत आहे.
एस.एस. राजपूत, तालुका कृषी अधिकारी, दिग्रस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com