Crop Insurance Compensation : राज्यात यवतमाळच्या शेतकऱ्यांची भरभराट

Aslam Abdul Shanedivan

पिक विमाचा फायदा

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला त्यांना आता त्याचा फायदा होत आहे. आता पिक विमा परतावा होण्यास सुरूवात झाली आहे. याचा सगळ्याच अधिक फायदा हा यवतमाळच्या शेतकऱ्यांना झाल्याचे समोर येत आहे.

Crop Insurance Compensation | Agrowon

यवतमाळला कमी परतावा

यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना विमा परतावा हा सगळयात कमी झाला होता. तो दोन ते ५५ रुपये असा होता. त्यामुळे राज्यात येथे अतिशय कमी परतावा आल्याचे उघड झाले होते.

Crop Insurance Compensation | Agrowon

लाखात भरपाई

मात्र आता समोर आलेल्या नव्या माहितीनुसार विमा परतावा घेण्यात यवतमाळने आघाडी घेतल्याचे समोर आले आहे. येथील शेतकऱ्यांनी लाखात भरपाई घेतली आहे.

Crop Insurance Compensation | Agrowon

विधान परिषदेतही पडसाद

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्‍यातील शिवणी गावच्या दिलीप राठोड यांना ५५ रुपये ९९ पैसे इतका कमी परतावा मिळाला होता. त्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटले होते. त्यानंतर कृषी आयुक्‍तालयाकडून या प्रकरणी कृषिमंत्र्यांना माहिती देण्यात आली होती.

Crop Insurance Compensation | Agrowon

राज्यात सर्वाधिक भरपाई

राज्यात सर्वाधिक कमी भरपाई जरी यवतमाळच्या शेतकऱ्याचा सहभाग असला तरी सर्वाधिक भरपाई मिळालेल्या १४ शेतकऱ्यांपैकी यवतमाळच्या पाच शेतकरी आहेत.

Crop Insurance Compensation | Agrowon

जिल्ह्यातील पाच शेतकरी

राज्यात अत्यल्प भरपाई मिळाली म्हणून यवतमाळ जिल्हा चर्चेत आला. त्याच जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांना काही लाखांत भरपाई मिळाली आहे. राज्यात लाख रुपयांची भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण यवतमाळमध्ये सर्वाधिक आहे.

Crop Insurance Compensation | Agrowon

कोणाला किती भरपाई

जिल्ह्यातील झरी जामणीतील चंद्रप्रकाश छाछडा यांना ५ लाख ६० हजार ६४८ रुपये, कळंबमधील किशोर यादव रुईकर यांना ४ लाख २६ हजार ७७, गोविंद गणपत रुईकर - ३ लाख ७६ हजार ५७६, नारायण गणपत रुईकर- ३ लाख २७ हजार ५७०, वसंत वामन सराटे यांना ३ लाख १२ हजार ९०६ रुपये इतकी विमा भरपाई मिळाली आहे.

Crop Insurance Compensation | Agrowon
Safflower Use | Agrowon
आणखी पाहा