Climate Change Index : भारताला हवामान बदलामुळे १८० बिलियन अमेरिकन डॉलरचा दणका; चीन दुसऱ्या तर भारत सहाव्या क्रमांकावर

India's economy has lost US$ 180 billion : हवामान बदलामुळे मागील ३० वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचं १८० अब्ज अमेरिकी डॉलरचं नुकसान झालं असून जर्मनवॉचने प्रकाशित केलेल्या २०२५ च्या क्लायमेट रिस्क इंडेक्समध्ये भारत ६ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे देशासमोर हवामान बदलांच संकट अधिक गहिरं होत असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
Climate Change
Climate ChangeAgrowon
Published on
Updated on

Germanwatch Climate Index 2025 : हवामान बदलाच्या फटक्याने शेतकरी जेरीस आला आहे. उष्णतेच्या लाटा, पूर, चक्रीवादळाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होऊ लागलं आहे. हवामान बदलामुळे मागील ३० वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचं १८० अब्ज अमेरिकी डॉलरचं नुकसान झालं असून जर्मनवॉचने प्रकाशित केलेल्या २०२५ च्या क्लायमेट रिस्क इंडेक्समध्ये भारत ६ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे देशासमोर हवामान बदलांच संकट अधिक गहिरं होत असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

जर्मनवॉच हे हवामान बदलांचा मानव आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचं विश्लेषण करणारे थिंक टॅंक आहे. जर्मनवॉच इंडेक्समध्ये हवामान बदलाच्या घटनांचा देशावर आर्थिक आणि मानवी परिमाणानुसार कसा परिणाम होतो, यानुसार क्रमवारी ठरवली जाते. यामध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या देशांचा क्रमवारी प्रथम क्रमाकावर असते.

Climate Change
Climate Change : वातावरण बदलावर पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ

जर्मनवॉचच्या इंडेक्सनुसार, भारतात १९९३ ते २०२२ दरम्यान हवामान बदलाच्या ४०० घटना घडल्या. यामध्ये १९९३, १९९८ आणि २०१३ मध्ये महापूराचा फटका बसला. तर २००२, २००३ आणि २०१४ मध्ये उष्णतेच्या लाटांचा फटका बसल्याच्या घटनांकडे लक्ष वेधलं आहे. त्यामुळे देशातील हवामान बदल देशासमोर गंभीर समस्या म्हणून उदयास आल्याचं दिसतं.

जर्मनवॉचच्या इंडेक्समध्ये जगभरात हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील अविकसित आणि विकसनशील देशांचा समावेश आहे. डोमिनिकासारख्या राष्ट्रांना तर तीव्र हवामान बदलांमुळे देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा (जीडीपी) अनेक पटीने फटका बसल्याच्या स्थितीकडे लक्ष वेधलं आहे.

वास्तविक देशातील तीव्र स्वरूपाच्या हवामान बदलांमुळे शेती आतबट्टयाचा धंदा झाला आहे. शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेल्या घास हवामान बदलामुळे हिरावून घेतला जात आहे. यावर केंद्र सरकार मात्र थातुरमातुर घोषणा करण्यापलीकडे जाण्यास तयार दिसत नाही. संसदेत अलीकडेच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात हवामान बदल अनुकूल वाण निर्मितीच्या वल्गना करून अर्थमंत्र्यांनी जूनेच पाढे वाचून दाखवले. परंतु हवामान बदलाचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन धोरणात्मक उपाययोजना हात घातला नाही.

१९९३ ते २०२२ दरम्यान दरम्यान जगभरात ९ हजार ४०० हून लोकांचा मृत्यू हवामान बदलांमुळे झाला. त्यामुळे ४.२ ट्रिलियन अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे डोमिनिका, चीन भारत, होंडुरास, म्यानमार, वानुआतू, फिलिपिन्स देशांमध्ये तीव्र हवामान बदल होत असल्याचं या जर्मनवॉचच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Climate Change
Climate Change NICRA Project : हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज; 'एनआयसीआरए' प्रकल्पातून अभ्यास सुरू असल्याची लोकसभेत दिली माहिती

१९९२-२०२२ दरम्यान सर्वाधिक प्रभावित देश (जर्मनवॉच क्लायमेट इंडेक्स)

१) डोमिनिका

२) चीन

३) होंडुरास

४) म्यानमार

५) इटली

६) भारत

७) ग्रीस

८) स्पेन

९) वानुआटु

१०) फिलीपिन्स

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com