Water Reservoir : बुलडाणा जिल्ह्यातील १७७ जलाशये घेणार मोकळा श्‍वास

Increase Water Storage by Removing Silt : वर्षानुवर्षे प्रकल्पांमध्ये गाळ साचल्याने पाणीपातळीत घट निर्माण झालेली आहे. अशा स्थितीत आता प्रकल्पातील गाळ काढून जलसाठा वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
Efforts to increase water storage by removing silt
Efforts to increase water storage by removing siltAgrowon

Buldhana News : वर्षानुवर्षे प्रकल्पांमध्ये गाळ साचल्याने पाणीपातळीत घट निर्माण झालेली आहे. अशा स्थितीत आता प्रकल्पातील गाळ काढून जलसाठा वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. या वर्षी जिल्ह्यातील १७७ जलाशये गाळमुक्त करण्याचा उपक्रम प्रशासनाने हातात घेतला असून शेतकऱ्यांना या प्रकल्पातील गाळ मोफत मिळणार आहे.

Efforts to increase water storage by removing silt
Galmukt Dharan Yojana : धरणांतील गाळ काढण्यासाठी १५ कोटींचा आराखडा

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण आणि राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या मालकीच्या १७७ जलाशयांमधील गाळ काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून हा गाळ काढण्यात येत आहे. शेतामध्ये गाळ टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. यासाठी शेतकऱ्यांना गाळ मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांना गाळ काढण्यासाठी कोणत्याही यंत्रणेला शुल्क देण्याची गरज नाही. हा गाळ शेतीच्या उपयोगासाठी मोफत उपलब्ध असणार आहे.‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ हा उपक्रम ग्रामपंचायतीसह शेतीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे प्रशासन वारंवार आवाहन करीत आहे.

Efforts to increase water storage by removing silt
Water Issue : प्रकल्पात गाळ साठल्याने पाणी समस्येत ‘भर’

पावसाळा सुरू होण्यासाठी जेमतेम दीड महिन्यांचा कालावधी राहिला आहे. या कालावधीत धरणातील गाळ काढण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे. विहित मुदतीत ही कामे न झाल्यास ग्रामपंचायतीचे नुकसान होईल. पावसाळ्यात धरणातील गाळ काढता येणे शक्य नसल्याने जलसंधारण विभागाने या कामात अटकाव करू नये, असे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत. गाळ काढण्यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. तसेच हा गाळ शेतीमध्ये टाकण्यात आल्यामुळे सुपीकता वाढण्यास मदत होईल.

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ हा उपक्रम राबवला जात आहे. याद्वारे शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना गाळ काढणे आणि शेतापर्यंत वाहतूक करण्याचा खर्च उचलावा लागणार आहे. शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत उपलब्ध असून यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा.
-डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी, बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com