
Wardha News : शेतीसोबतच बिगर सिंचन पाणी (Irrigation Water) वापर संस्थांनाही पाटबंधारे विभागाकडून (Irrigation Department) पाण्याचा पुरवठा केला जातो. सद्यःस्थितीत या संस्थांकडे तब्बल १२.५५ कोटी रुपयांचा पाणीपट्टी कर थकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
या संस्थांना नोटीस बजावण्यात आल्या असल्या, तरी वसुलीबाबत मात्र पाटबंधारे विभाग फारसा गंभीर नसल्याचा आरोप आहे.
जिल्ह्यातील मध्यम आणि मोठ्या जलशयातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी वापर होतो. शेतीसोबतच बिगर शेती सिंचनकामी देखील हे पाणी वापरले जाते.
महाकाळी येथील धाम जलाशयातील पाणी धाम नदीपात्रात सोडण्यात आल्यावर वर्धा शहराशेजारील तेरा गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, औद्योगिक वापरासाठी वर्धा एमआयडीसी, मध्ये रेल्वे विभाग वर्धा शहरातील पाणीपुरवठ्यासाठी वर्धा नगरपालिका, औद्योगिक वापरासाठी भूगाव येथील उत्तम व्हॅल्यू स्टील कंपनी, ग्रामस्थांना पाणीपुरवठ्यासाठी पवनार व आंजी (मोठी) ग्रामपंचायत, मदन प्रकल्पातून औद्योगिक वापरासाठी मानस ॲग्रो जामणी व बिगर सिंचन पाणी वापर संस्था पाण्याची उचल करतात.
याच संस्थांकडील थकित पाणीकराची रक्कम १२.५५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. २०१८ मध्ये दुष्काळी परिस्थितीत वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्पातील पाणी चंद्रपूर जिल्ह्याला देण्यात आले.
त्या वेळी बिल्ट ग्राफिक्स पेपर मिल बल्लारशाह व इतरांकडे पाणीपट्टी थकीत होती. त्यातील ५७.६० लाखांची रक्कम थकबाकी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूर यांच्या आदेशान्वये कमी करण्यात आली, अशी माहिती आहे.
अशी आहे थकबाकी (लाखांत)
जीवन प्राधिकरण - ७.६१
एमआयडीसी वर्धा - ३५.४८
मध्य रेल्वे वर्धा - १०.६२
नगरपालिका वर्धा - १३२.८९
उत्तम व्हॅल्यू स्टील कंपनी- ११७.००
ग्रामपंचायत पवनार - ३.२९
ग्रामपंचायत आंजी मोठी - १.४४
ॲग्रो जामणी - ८७७.०८
बिल्ट ग्राफिक्स पेपर मिल बल्लारशाह - ५८.३९
नगर परिषद राजुरा - ०.९५
हॉटेल अरण्यक बोरधरण - ०.१६
विश्रामगृह बोरधरण - ०.२५
मत्स्य बीज केंद्र - १०.१४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.